लक्ष्मीमाते....
लक्ष्मीमाते प्रसन्न होई
दे दे दे वरदान मला!
शांति सुखाचा अक्षय ठेवा
तशी सन्मती देइ मला! ध्रु.
नको द्रव्य मज कष्ट न करता
आलस्याची नकोच वार्ता
जी लागे दुर्बलाकारणी
शक्तिसंपदा देइ मला!१
या देहाचा विसर पडावा
खरा देव ओळखता यावा
जरी दरिद्री मज नारायण -
दिसो, दृष्टि देई विमला!२
श्रद्धा वैभव प्रल्हादाचे
निश्चयबळ ते बालध्रुवाचे
अज्ञानाच्या तमातुनी ने
प्रकाशाकडे जगताला!३
सदाचार हे सोने आहे
सद्विचार हे भूषण आहे
सात्त्विकता सौन्दर्य खरे ते
ती श्रीमंती देइ मला!४
- श्रीराम बाळकृष्ण आठवले
(१९८५ सालची रचना)
लक्ष्मीमाते..
👆🏻 ऑडिओ
लक्ष्मीमाते प्रसन्न होई
दे दे दे वरदान मला!
शांति सुखाचा अक्षय ठेवा
तशी सन्मती देइ मला! ध्रु.
नको द्रव्य मज कष्ट न करता
आलस्याची नकोच वार्ता
जी लागे दुर्बलाकारणी
शक्तिसंपदा देइ मला!१
या देहाचा विसर पडावा
खरा देव ओळखता यावा
जरी दरिद्री मज नारायण -
दिसो, दृष्टि देई विमला!२
श्रद्धा वैभव प्रल्हादाचे
निश्चयबळ ते बालध्रुवाचे
अज्ञानाच्या तमातुनी ने
प्रकाशाकडे जगताला!३
सदाचार हे सोने आहे
सद्विचार हे भूषण आहे
सात्त्विकता सौन्दर्य खरे ते
ती श्रीमंती देइ मला!४
- श्रीराम बाळकृष्ण आठवले
(१९८५ सालची रचना)
लक्ष्मीमाते..
👆🏻 ऑडिओ
No comments:
Post a Comment