सद्गुरु ईश्वरीय अवतार!ध्रु.
दिक्कालाचे तुला न बंधन
स्वस्थानातुन स्फुरवी चिंतन
राजयोगी की योगिराज हा
कोणाते कळणार?१
आदि न अंत न त्याचे कार्या
त्रैलोक्यांतरि भरली माया
शक्तिसंक्रमण करुनि साधका
आश्वासन देणार!२
दत्तात्रय हा युगायुगांचा
महिमा वदता शिणते वाचा
शशिसम शीतल हा करुणाकर
आर्तासी आधार!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(पटदीप)
No comments:
Post a Comment