Sunday, January 30, 2022

गाऊ ध्याऊ स्वरूपानंद


गाऊ ध्याऊ स्वरूपानंद
अनुभवु या सत् चित् आनंद ! ध्रु.

सोऽहं भावे सांडुनि मीपण
स्वामीपदी व्हायचे तल्लीन
सुखे हाता गवसे तत्त्वबोध!१

सर्वभावे शरण जायाचे
देहभावास तुडवायाचे
तट तटा तुटे भवबंध!२

रात्रंदिन ध्यास लागू दे
अनुसंधान स्थिर राहू दे
सोऽहं ध्यानाचा लागो छंद!३

दिव्य प्रेम वसे त्या हृदयी
झुळझुळते गंगामाई
आकंठ पिऊ आनंद!४

तेजाळ स्फुरो ओंकार
तो प्रसन्न प्रभु हुंकार
व्हावा सैल सैल देहबंध!५

सज्जना निरंजन संता
वंदितो तया अवधूता 
गाउ दे होऊनि बेबंद!६

काही पालट जीवनि व्हावा
अंतरी राम तोषावा
तो विमुक्त तो चि अनंत!७

संतांसी जाता शरण
घडतसे सहज उद्धरण
जीवनि फुलवु संगीत!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९७३

No comments:

Post a Comment