Friday, January 28, 2022

आरती समर्थ रामदासांची

आरती रामदासा श्रीस्वामी समर्था
उपासना चालवाया शक्ति द्यावी समर्था!ध्रु.

रामनवमीस जन्म रामनामात गोडी
बालवयी विश्वचिंता नवलाई केवढी!१

सावधान ऐकताच खग व्योमी उडाला
निळाईत रामरूप दिसे नारायणाला!२

शक्तियुक्तिभक्ति येथ कशी राहाया आली
समर्थांची सारी लीला मनी प्रभात झाली!३

मनोबोध दासबोध रूप स्वामींचे आहे
आत्माराम सान ग्रंथ आत्मा दासाचा आहे!४

नित्य भेट रामा द्यावी यावे घरात स्वामी
तत्त्वबोध आचराया भक्ता रमवा नामी!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१०.०२.१९८४

No comments:

Post a Comment