Sunday, January 16, 2022

खड्गहस्त व्हा

आली संधी, घेणे आधी, सैन्यात शिरा, सैन्यात शिरा! ध्रु.

भूदलि, नौदलि, वायुदलि वा
मिळेल तेथे प्रवेश घ्या
रणविद्या आत्मसात करण्या- तुम्हि यत्नांची शर्थ करा!१

शस्त्रसज्ज व्हावा, युद्धसिद्ध व्हा
मातृभूमिचे खड्गहस्त व्हा
नेत्र आपुले ठेवुन उघडे अत्र तत्र संचार करा!२

राष्ट्रा अपुल्या समर्थ करण्या
क्षात्रवृत्ति अंगात बाणण्या
उचला बंदुक, सुयोग्य वेळी टोक तिचे उलटेच करा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(काव्यमय सावरकर दर्शन)

No comments:

Post a Comment