नाथपंथी सिद्धपुरुषा, गाऊ तुम्हा आरती!
गाऊ तुम्हा आरती!ध्रु.
गाऊ तुम्हा आरती!ध्रु.
जीवनी अमुच्या भरावे
तत्त्वबोधा बोधवावे
सर्वभावे शरण आलो लेकरे तुम्हांप्रती!१
प्रेमदीपा, ज्ञानदीपा
कर्मदीपा, भक्तिदीपा
दुरिततिमिरा घालवावे प्रार्थना ही संप्रती!२
आपुल्या या प्रेमलोभे
वाणिते विश्रांती लाभे
द्या गुरो आम्हां दयाळा मुक्तहस्ते सन्मती!३
कोण मी? हे जाणले
देहभावा होमिले
हे जितेंद्रा नित्यतृप्ता वंदना द्या स्वीकृती!४
शारदेच्या प्रियकुमारा
दानशूरा हे उदारा
तोल राखाया मनाचा साह्य द्या आम्हांप्रती!५
क्षेत्र झाले पावस
तव निवासे लोभस
हे विभूते, ज्ञानराजा भावनोर्मी उसळती!६
प्रेमला गुरुमाउली
शीत छाया जाहली
भक्ति ही अमुची कृतज्ञा अर्पितो चरणांप्रती!७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment