तुझ्या दर्शनाला देवा, मला दृष्टि देई
धरुनि हात प्रेमे माझा, भक्तिपथे नेई!ध्रु.
धरुनि हात प्रेमे माझा, भक्तिपथे नेई!ध्रु.
दिसे भासते ते सारे मोहवी मनाला
खेळ वासनांचा सारा, तृप्ति ना जिवाला
अशिव शिवा नेई विलया दुजे नको काही!१
तुझा वास देही आहे सांगतात संत
दीर्घ असे अंतर्यात्रा तिला कुठे अंत?
श्वास श्वास नामी रंगो पवनमाळ देई!२
लोक झोपलेले जेथे तिथे जाग यावी
हपापली दुनिया जेणे - वासना नसावी
मन:शांति संयमनाने जाण हीच देई!३
कसा विटाळू या देहा नको विडी दारू
रघूनायका तीराला तूच लाव तारू
मनोबोध हरिपाठाला जगी तुला नाही!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.१०.१९८७
No comments:
Post a Comment