Thursday, January 11, 2024

संवादसंगमी स्नान करूं !

'सोऽहं हंस:'

संवादसंगमी स्नान करूं ! संवादसंगामी स्नान !ध्रु. 

माधव वक्ता 
पांडव श्रोता 
ते वचन सुधामय श्रवण करू ! १

फिटे अहंपण- 
ब्रह्मि निमज्जन 
गीतेचे चिंतन सतत करू!२ 

मी देह नसे 
तो मीच असे 
सोऽहं सोऽहं स्मरण करू!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१८.१२.१९७४

ऐसा श्रीकृष्णार्जुन । 
संवादसंगमीं स्नान । 
करूनि देतसे तिळदान । 
अहंतेचें ॥ [ १८ : १६१९ ]
या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १९९ वर आधारित काव्य.

No comments:

Post a Comment