ॐ
नाम घ्यावे, नाम घेता मीपण लोपावें!
मी पण लोपावे आणि तो मी ! उमजावे!ध्रु.
भक्तीची ही वाट बरी
राघवाकडे जात खरी
संतांलागी वाट पुसुनी पुढती चालावे!१
सगुण सावळा तो श्रीराम
निर्गुण बरवा आत्माराम:
त्रयोदशाक्षरि मंत्र जपावा रामाचे व्हावे!२
जेथे तेथे आत्माराम
घ्यावे, गावे मंगलनाम
अमृतगोडी आहे थोडी, आपण जाणावे!३
जेथे तेथे आत्माराम
घ्यावे, गावे मंगलनाम
अमृतगोडी आहे थोडी, आपण जाणावे!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.११.१९७६ शनिवार
No comments:
Post a Comment