आरती विवेकानंदा !
हे आनंदाच्या कंदा ! ध्रु.
हे आनंदाच्या कंदा ! ध्रु.
तू विश्वाची भूपाळी
तू मानवता अवतरली
तू प्रेममूर्ति, तू ज्ञानमूर्ति
सोऽहं च्या सुंदर गंधा!१
जरी असती पंथ अनंत
प्राप्तव्य एक भगवंत
हे चिरप्रवासी, हृदय निवासी
वंदन पदारविंदा!२
सद्गुरु रामकृष्णांचा
संदेश जगा कथिण्याचा
सन्मान मिळाला सच्छिष्याला
आनंदा स्वच्छंदा!३
अरुणोदय झाला दावी
तव निर्मल छाटी भगवी
तू ज्ञानसूर्य तू शांतिचंद्र
तू घडव आत्मसंवादा!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
११ जानेवारी २००६ बुधवार
दुपार २-१०
No comments:
Post a Comment