पावसला जाऊ ! जाऊ !
'स्वरूप दर्शन' घेऊ ! धृ.
'स्वरूप दर्शन' घेऊ ! धृ.
"राम कृष्ण हरि" वदे वैखरी
एक अनामिक ओढ अंतरी
हृदयी गुरु पाहू!१
सोऽहं दीपे उजळू जीवन
तीच दिवाळी सरणे मीपण
शांत स्वस्थ होऊ!२
नित्यपाठ नित गाता गाता
भावार्थासह प्रगटे गीता
हरिमयता लाहू!३
श्रीस्वामी ते श्रीज्ञानेश्वर
आपण सगळे विनम्र किंकर
प्रसाद हा सेवू !४
अभ्यासाचा छंद जडू दे
स्वामी चरणी देह पडू दे
गुरुचरिता गाऊ !५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०८.११.१९८५
स्वामी स्वरूपानंद सुबोध संक्षिप्त चरित्र ह्या अण्णांनीच लिहिलेल्या पुस्तकाची प्रत मिळाल्यावर, त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर लिहिलेले काव्य.
५
No comments:
Post a Comment