Thursday, January 25, 2024

श्रीसमर्थ रामदास

श्रीराम जय राम जय जय राम!ध्रु.

जांबेचा मी नारायण तो रामदास झालो  
रघुवीराला भेटायाला नाशिकला आलो.
मारुतिने करि धरिले मजला-
भेटविला श्रीराम!१

रामाचे मज वेड लागले, मागतसे भिक्षा
भिक्षेचे हे निमित्त केवळ ती दिव्या दीक्षा
हडबडलेल्या जना धीर दे
तारक प्रभु श्रीराम!२

काय कुणाचे खातो आम्ही राम मला देतो
आकाशातुन भूवर वृष्टि कोण दुजा करतो
रामच कर्ता राम करविता
शिकवी मेघश्याम !३

उपासना तो करवुन घेतो समर्थ केवळ तो
देहबुद्धि विलयाला नेतो सद्गुरु केवळ तो
सगुणाच्याही उपासनेतुन
ज्ञान देत श्रीराम ।४

विवेकमार्गाने चालावे अनुभव मग घ्यावा
प्रपंच नुरतो आता ओझे रामराय ध्यावा
दासबोध हा मजला स्‍फुरला
सर्वस्‍वच श्रीराम!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१०.१२.१९८९

No comments:

Post a Comment