Sunday, January 21, 2024

भय जाण्याला राम म्हणा !

ॐ श्रीराम समर्थ

भय जाण्याला राम म्हणा ! 
राम म्हणा, राम म्हणा ! ध्रु.

देहामागे मृत्यु लागला 
भयें व्यापिले ब्रह्मांडाला 
निर्भय करिते उपासना!१ 

धन असले तरि चिंता आहे 
धन नसले तरि चिंता आहे 
का न लागणे हरिभजना?२ 

होणारे ते होउन जाते- 
व्यर्थचि जग हे चिंता करते
भोग जिवाला चुकेच ना! ३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२१.०७.१९७७

No comments:

Post a Comment