देह हा देवाच्या प्राप्तीकरितां आहे ही जाणीव सद्गुरू देतात.
देव लाभावा, देव जोडावा-
नरदेह म्हणुनि हा मनुजाला!ध्रु.
सगळेजण परि देवाच्या घरीं
करिताती विषयांची चोरी
का पात्र न आम्ही दंडाला! १
नको नको ही विषयासक्ती
बरी मनापासुनि हरिभक्ती
मग शांती वरिते चित्ताला! २
पाळु या पथ्य प्रभुनामाचे
तोडु या बंध मग विषयांचे
मागु या चिकाटी रामाला! ३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक १८६, ४ जुलै वर आधारित काव्य.
आपल्याला त्याने हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून दिला, परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरतो आहोच की नाही ! म्हणून, विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी.
No comments:
Post a Comment