आधी असे पहावे
गृह स्वर्ग हे गमावे!ध्रु.
गृह स्वर्ग हे गमावे!ध्रु.
नामात राहिल्यास
भवभ्रांतिचा निरास
भजनात दंग व्हावे!१
आनंद हा विशाल
स्वार्थास घालवील
नामे मनी ठसावे!२
आनंद हाच नित्य
तो देवरूप सत्य
विषयातुनी वळावे!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १४६ (२५ मे) वर आधारित काव्य.
आपली वृत्ति अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. जीवन हे मूलतः आनंदमय आहे. सृष्टिक्रमावर सोडले तर ते सुखी होईल. सर्व जगाला आनंद हवा असतो. आनंद हा शाश्वत आहे; पण आपण विषयातच आनंद मानतो, त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही. वासना भगवंताकडे वळवली तर माणसाला आनंदरूप बनविते, पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते. वासना, म्हणजे अभिमान किंवा मीपण, हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो. वासनेला जिंकण्यास भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही. वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास. जेथे वासना संपली तेथे आनंदच आहे. सदासर्वकाळ नामात राहिल्यास वासनेचा हळूहळू अंत होऊन केवळ आनंदच आपल्याजवळ राहील.
No comments:
Post a Comment