राम सखा झाला! माझा राम सखा झाला!ध्रु.
प्रेम फार नामी, माझी वृत्ति रमे रामी
सर्व सुखे धामी ठाकली कर अपुले जोडुनी
जीवनी हीच भाग्यवेला!१
सखा रघुवीर, देतसे मानसास धीर
पापदैत्य वधितो अचुक हा रामनाम तीर
कंठ मम दाटुनिया आला!२
राम हाच साक्षी, संकटी साधकास रक्षी
प्रेमळ ही माय, दुरूनी बालकास लक्षी
वात्सल्या ना तुळा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १८२ (३० जून) वर आधारित काव्य.
No comments:
Post a Comment