प्रसाद पुष्पे - आस मुक्त श्वासाची.
जग काय म्हणेल? या भययुक्त भावनेने वागणे हा झाला व्यवहार. अर्थात् जगाने आपल्याला चांगलेच म्हणावे असे वाटते तर मग जगाला आपली भक्ती दिसावी, औदार्य दिसावे, विद्वत्ता दिसावी, श्रीमंती दिसावी या भावनेतून गोष्टी घडत जातात. वेगवेगळे समारंभ पहा, माणूस कसा वागत असतो? झालंच तर जयंती, पुण्यतिथी यांचे कार्यक्रम पहा.
एकंदरीत सगळं वातावरण असं असतं की गोंधळायला, गुदमरायला होतं, मोकळेपणा वाटत नाही.
मुखवट्यांचे जग! आनंदप्रदर्शन नकली तसंच दुखवटा - तो सुद्धा नकली.
जो तो योजनापूर्वक अभिनय करतो. जगाला बेमालूमपणे फसवता फसवता आपणही फसतो.
यातून बाहेर नाही का पडता येणार? मोकळी हवा नाही का कुठेच मिळणार?
आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे. मनातल्या मनात नाम घ्यावे. तो आतून साह्याला धावतो. विवेक सुचवतो. मात्र मग आता जनाचे न ऐकत बसता केवळ त्याचेच ऐकावे.
भगवंत काय म्हणेल? तो आपल्याकडे नेहमीच पहात असतो हे जाणून कुणाचेही मन न दुखवणे, स्वकर्तव्याला न विसरणे, कुणाविषयी अढी न ठेवणे हाच तो परमार्थ.
'तो दंभ नको, अभिमान नको, मज भक्ति हवी ती दे देवा!'
लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

No comments:
Post a Comment