ग्रंथ भागवत थोर भक्तिकथा
ऐकताच भक्ता मोक्षलाभ !१
ऐकताच भक्ता मोक्षलाभ !१
याच देही मुक्ती सांगे हरि युक्ती
यात्रिकाला शक्ती चालावया !२
कृष्णनाम गावे देहातीत व्हावे
अंतरी पहावे ज्याचे त्याने !३
इंद्रियांच्या गाई सांभाळी गोपाळ
भक्तांचा सांभाळ तोच करी !४
आत्म्याची मुरली ऐकतो संयमी
तो न रमे कामी सदा स्वस्थ !५
वासुदेव हरि पांडुरंग हरि
राम कृष्ण हरि म्हणा म्हणा !६
नाम मुखी यावे ऐसे जर व्हावे
नाम नेटे घ्यावे गोविंदाचे !७
म्हणा कृष्ण कृष्ण कळू लागे गीता
अर्थ सांगे भक्ता जीवनाचा !८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०७.१९९०
No comments:
Post a Comment