गुरुराया शरण आलो, मी तुमचा झालो झालो!ध्रु.
नि:संशय मन हे व्हावे
प्रभुनाम जिभेवर यावे
गुरुदत्त नाम मी घेता, मी घडे सुधेचे प्यालो! १
ही वृत्ती शांत करावी
भक्तीची वाट दिसावी
तम मावळण्या हृदयीचे- सद्गुरो शरण मी आलो! २
विषयांत राहुनी जगती
कशि आणू अलिप्तता ती?
द्या आपण नामप्रचीती – मी प्रेमभुकेला झालो! ३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन १९२ – १० जुलै वर आधारित काव्य)
सद्गुरुस जावे शरण! संशयविरहित वृत्तीने घ्यावे नाम!
No comments:
Post a Comment