प्रभातसमयी अर्घ्य अर्पितो –
तेजोनिधि नारायणा ! ध्रु.
तेजोनिधि नारायणा ! ध्रु.
पवन सुगंधित आला आला
उष:काल जाहला जाहला
ओंजळ भरून देतो जीवन –
अर्थ यावा जीवना !१
आत्मरूप तू सत्यरूप तू
यज्ञरूप तू स्वस्वरूप तू
अनंत नमने तुला दिनेशा
सत्कर्मा दे चालना !२
अंत:करणी तू उगवावे
मंगल मंगल तू वदवावे
योगाभ्यासा मती गती दे
सुरेल स्वर दे गायना!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.०५.१९८२
# श्री सद्गुरु नारायण महाराज, बेट केडगाव
No comments:
Post a Comment