हे मना बन कठोर, शत्रुशिबिरि जाउ दे!
विरह घोर साहु दे!ध्रु.
दोन्हि गाल अश्रुसिक्त
मायभू न अजुनि मुक्त
सुखविलासि हो विरक्त
तुच्छ क्षुद्र हेतु ना स्वप्नि स्पर्शु दे ! १
छळत दास्यश्रुंखला
श्वास आत कोंडला
देश मम विटंबिला
वैनतेय बनुनि मजसि झुंज झुंजु दे! २
लढताना मरु मारू
शत्रूते पुरुनि उरू
यत्नांची शर्थ करू
भागीरथि आणण्यास वज्रशक्ति दे! ३
अंतिम सुख लाभण्यास
मातृबंधमोचनास
सिद्ध कष्ट साहण्यास
राष्ट्रमंदिरातळि मज दगड होउ दे! ४
ज्यास देश मायतात
बंध त्यास काय करत
हसत सहत सहत हसत
मम जीवनि उद्याना मजसि फुलवु दे! ५
मेघजले न्हावयास
ग्रीष्म हवा साहण्यास
प्राण पणा लावण्यास
हार असो फास असो तोल राहु दे! ६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment