रामस्मरणी नित्य राहतो त्यास न बाधे माया!
शांति येतसे त्याच्या सदनी नित्य निवास कराया! ध्रु.
शांति येतसे त्याच्या सदनी नित्य निवास कराया! ध्रु.
भगवंताचे स्मरण करावे ठेवी तसे रहावे
अपुल्यामध्ये विश्व पहावे सोऽहं ध्यानि रमावे
आत्मसुख असे अपणापाशी जगी भटकणे वाया!१
रूप बदलते नसे रूप तो, स्थिर रामाचे नाम
उठता बसता तयास ध्यावे करत आपुले काम
कृपावंत सद्गुरु धरताती शिरि कृपेची छाया!२
स्वार्थ ज्या स्थली, अशांति तेथे समाधान लाभेना
परमार्थाची कांता शांति अद्वयत्व सोडेना
आत्मा आत्माराम मानता मंदिर झाली काया!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन २४२ (२९ ऑगस्ट) वर आधारित काव्य
No comments:
Post a Comment