दत्तरूप नारायणा, नारायण रूप दत्ता
चराचरावर सत्ता, योगिराजा हो श्रीमंता
श्रद्धा राहील अचला, ऐसा आशीर्वाद द्या !
केडगाव दत्तनगरी
हीच आळंदी, पंढरी
वारी घडो पुन्हा पुन्हा भक्ता अनुग्रह द्या!
सत्यनारायण पूजा
हाच सोपा यज्ञ दुजा
वेदोनारायण पूजा करून घ्या!
दत्त हाच नारायण
दर्शनेच पटे खूण
देह शुद्ध, मन शुद्ध प्रसाद हा द्या!
अर्घ्य सूर्यनारायणा
प्रभावी ही उपासना
संध्या साधेल सर्वदा तथास्तु वदा!
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.११.२००३
# श्री सद्गुरु नारायण महाराज, बेट केडगाव
No comments:
Post a Comment