श्री अष्टविनायकयात्रा
तारक ही मानवमात्रा ! ध्रु.
तारक ही मानवमात्रा ! ध्रु.
ॐकाराच्या उच्चाराने
श्रवणे मनने तसे दर्शने
आनंद गात्रा गात्रा! १
श्रीमयुरेश्वर सिद्धिविनायक
बल्लाळेश्वर वरदविनायक
सुखवत नेत्रा नेत्रा! २
हे गिरिजात्मज तू हि गणपती
तूच विघ्नहर तसा गणपती
परमवंद्य सत्पात्रा! ३
चालत चालत जर ती घडली
ती दसरा अन् तीच दिवाळी
तोषिणी प्राणीमात्रा! ४
ॐ गँ ॐ गँ गाता गाता
गणेशमूर्ती आत प्रकटता
सफला प्रकाशयात्रा! ५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०८.२००६
# अष्टविनायक गीते
No comments:
Post a Comment