आरति गजानना गाऊ!
गाउनि धन्य धन्य होऊ! ध्रु.
गाउनि धन्य धन्य होऊ! ध्रु.
विघ्नांचा हर्ता
अहो हा विद्येचा दाता
यासी प्रेमभरे ध्याऊ! १
थुलथुलीत दोंद
हलवि हा लीलेने सोंड
तयाच्या कौतुकास पाहू! २
रक्तवर्ण विलसे
रक्तांबर सुदर भासे
यासी हृन्मंदिरि ठेवू! ३
मोदक वाम करी
दक्षिण कर अभया वितरी
ध्यान हे रात्रंदिन ध्याऊ! ४
मूषकि बैसे हा
काला चरणी नमवित हा
ऐश्या महोत्कटा गाऊ! ५
शुभारंभ करितो
कार्या सिद्धीसी नेतो
याचे गुणगायन गाऊ! ६
ॐ या उच्चारी –
राहतो पाशांकुशधारी
वदे श्रीराम नम्र होऊ! ७
वदे श्रीराम नम्र होऊ! ७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.०८.१९७६
No comments:
Post a Comment