श्रीकृष्ण कसा, तो गीतेमधुनी दिसतो
संवाद सुखाचा भक्तासंगे करतो!ध्रु.
संवाद सुखाचा भक्तासंगे करतो!ध्रु.
' हा देह न मी ' ही पहिली शिकवण त्याची
घालवी मरणभय अमृतवल्ली साची
जो स्थितप्रज्ञ तो स्वयेच माधव असतो !१
सुखदुःखे सम त्या मान तसा अपमान
आत्म्याचे असते सुज्ञाला नित भान
जो स्वस्थ तो न कधि क्षणभर विचलित होतो!२
नामात प्रेम त्या माधव जरी अनाम
ये आकाराला निर्गुण मुळचा श्याम
आनंद स्वरूपी अक्षय अनुभव देतो!३
जे कर्म विहित ते सुवर्णसंधी असते
ते घडता हातुन भगवत्पूजन घडते
तो ज्ञानयज्ञ तर अखंड चालू असतो!४
अविनाश अनादि धरा हातचा नित्य
चुकणार गणित नच त्रिवार सांगे सत्य
परमात्मगिरीतुन मोदझरा झुळझुळतो! ५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४/११/१९९७
No comments:
Post a Comment