Thursday, July 9, 2026

श्रीस्वामीसमर्थाची भूपाळी


अक्कलकोट निवासी स्वामी भूपाळी गातो-
आजानुबाहो दिगंबरा हो गाताना ध्यातो!ध्रु. 

भिऊ नको, मी तव पाठीशी या वचने धीर 
कृतज्ञतेने हात जोडता नयनी ये नीर 
निर्मळ मन ते, देहहि काटक आस मनी धरतो!१ 

विलास व्यसने विषयांचा तर दंगा चालतसे 
अधर्मास या समूळ निपटे ऐसा कोण असे? 
भेदकदृष्टी, धारदार वच चरणी हे प्रार्थितो!२

दत्त दिगंबर म्हणता म्हणता रूप आपले दिसे 
इथे तिथे संचार जरीहि सद्‌गुरु आत वसे 
निजनिष्ठा द्या, द्या कडवेपण भक्तवृंद मागतो!३ 

गुरुलीलामृत नित ऐकावे बाणे वैराग्य 
धर्म जागतो निवृत्तीचा हेच परम भाग्य
'श्रीस्वामी समर्थ जय जय' घोष नभी घुमतो!४

भेकड रडतो, निडर ठाकतो स्मरा परशुराम 
निर्धारे मनि धाक रिपूच्या जाणा हे ठाम 
श्रीरामाला हुरुप आगळा श्रीस्वामी देतो!५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२१.१२.१९९४

No comments:

Post a Comment