Thursday, July 9, 2026

अधिक मास आला आहे..

 ॥ श्रीगजानन प्रसन्न ।।

अधिक मास आला आहे-
अधिक चिंतन करण्यासाठी. १

अधिक मास आला आहे-
अधिक ओळखी होण्यासाठी. २

अधिक मास आला आहे-
अधिक प्रेमळ बनण्यासाठी. ३

अधिक मास आला आहे-
अधिक कार्य करण्यासाठी. ४

अधिक मास आला आहे- 
अधिक जवळ येण्यासाठी. ५

अधिक मास आला आहे-
अधिक रसिक बनण्यासाठी. ६

अधिक मास आला आहे-
अधिक निरोगी होण्यासाठी. ७

अधिक मास आला आहे-
अधिक नाम घेण्यासाठी. ८

अधिक मास आला आहे-
अधिक शक्ती मिळण्यासाठी. ९

अधिक मास आला आहे- 
हासत कष्ट झेलण्यासाठी. १०

अधिक मास आला आहे- 
मनातली अढी काढण्यासाठी. ११

अधिक मास आला आहे- 
मी, माझे हे जाण्यासाठी. १२

अधिक मास आला आहे-
अंतर्मुख होण्यासाठी. १३

अधिक मास आला आहे-
उत्तेजन देण्यासाठी. १४

अधिक मास आला आहे-
काटकपणा वाढण्यासाठी. १५

अधिक मास आला आहे-
देव घरात बसण्यासाठी. १६

अधिक मास आला आहे- 
हाव हावरी जाण्यासाठी. १७

अधिक मास आला आहे- 
गीता शिकून घेण्यासाठी. १८

अधिक मास आला आहे-
मुलांत मूल होण्यासाठी. १९

अधिक मास आला आहे-
जाणून आनंद लुटण्यासाठी. २०

अधिक मास आला आहे-
दूरदर्शी होण्यासाठी. २१

अधिक मास आला आहे-
ताल तोल जपण्यासाठी. २२

अधिक मास आला आहे-
साफसफाई करण्यासाठी. २३

अधिक मास आला आहे -
आशीर्वाद घेण्यासाठी. २४

अधिक मास आला आहे- 
मन कणखर बनण्यासाठी. २५

अधिक मास आला आहे-
द्वेषमत्सर गाडण्यासाठी. २६

अधिक मास आला आहे-
जाणता राजा कळण्यासाठी. २७

अधिक मास आला आहे-
कळी कळी खुलण्यासाठी. २८

अधिक मास आला आहे-
मने मोकळी होण्यासाठी. २९

अधिक मास आला आहे-
कायापालट घड‌ण्यासाठी. ३०

अधिक मास आला आहे-
त्याचा लाडका होण्यासाठी. ३१

अधिक मास आला आहे -
बोली अबोल होण्यासाठी. ३२

अधिक मास आला आहे -
असूनही नसण्यासाठी. ३३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९/८/१९९३

No comments:

Post a Comment