Thursday, June 18, 2020

बळी न द्यावे उगा जिवा....

तणाव आहे आत्मघातकी
बळी न द्यावे उगा जिवा
हालाहलहि पचवु शके हो
भजा भजा त्या सदाशिवा

नामाने पाषाणहि तरले
ढिले करा या देहाला
विसरा झाले-गेलेले
करा नियंत्रित श्वासाला

हे खावे ते प्यावे वाटे
बळेच ते दुरि सारावे
नच टाळावे परिश्रमाते
शरीर घामे भिजु द्यावे

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment