Sunday, June 21, 2020

जीवनात या श्रीराम भेटे करता व्यायाम!

जीवनात या श्रीराम
भेटे करता व्यायाम! ध्रु.

देहाची हालचाल व्हावी
घामाने काया भिजवावी
आत राम घेई नाम!१

जन्मभराची साथ धरा
मारुतिराया स्मरा स्मरा
सुखवी मनास व्यायाम!२

जळतरणाने आनंद
सूर्यनमस्कारे मोद
इष्ट घडतसे परिणाम!३

शरीर रथ सारथी तुम्ही
अर्जुन ते श्रीकृष्ण तुम्ही
सम अध्यात्म नि व्यायाम!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment