Tuesday, June 9, 2020

नाम घेत तुज जगायचे..

नाम घेत तुज जगायचे
अनुभव सांगत, विद्या वितरत
रोगा विसरत जगायचे!ध्रु.

तुझी वेदना देहापुरती
तू तर देह न सुजन सांगती
हासत सगळे सहायचे!१

रडणे कधीहि शोभत नाही
झुकणे शूरा ठाउक नाही
भानहि हरपुन लढायचे!२

बोलण्यात उत्साह हवा
कामामध्ये जोर हवा
रडायचे ना झुरायचे!३

औषध ते पूरक अन्नाला
सहा रसांच्या घे स्वादाला
मर्यादित जेवायाचे!४

आगमनाची जशी तयारी
निघावयाची हवी तयारी
मरणाला ना डरायचे!५

पुनर्भेटिची खात्री नाही
शुद्ध मनाची अपणा ग्वाही
अनंतात मिसळायाचे!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३.७.९६ (पहिली चार कडवी आणि १६.७.९६ (शेवटची दोन कडवी)

No comments:

Post a Comment