श्रीगुरुदत्ता चरणशरण मी अभयदान द्यावे आता
कमंडलूतिल तीर्थजलाने शांत करावे मम चित्ता!
तुम्हांस नमिता सरती चिंता माझे मानस गहिवरते
सद्गुरु सद्गुरु नाम अनावर सद्भावाला ये भरते!
घर सोडुनिया जा एकांती आसनावरी बैस जरा
मी नच कोणी घे घे जाणुनि अभिमानाचा कर निचरा!
काखे झोळी मनी दिवाळी, मुद्रेवरती प्रसन्नता
तो जाणतसे चराचरावर दत्तात्रेयाची सत्ता!
निःस्पृह अगदी आत्मतृप्त जो ऐसा माझा गुरुदेव
अंतरि वसतो मज सावरतो परमदयाळू गुरुदेव!
भस्म कपाळी भया निवारी नितसंचारी मज करते
असुनि नसावे नसुनि असावे ऐसी शिकवण ते देते!
अनसूयेचा सुपुत्र झाला ऐसा माझा गुरुदत्त
त्रिगुणातीतच अत्रितनय हा विश्वनिकेतन अवधूत!
द्वंद्वातीतच सद्गुरु हृदयी मला सांगतो धीर धरी
श्रद्धा सबुरी या वल्ह्यांनी भवसागर तू पार करी!
जो अविकारी तो अधिकारी प्रपंच त्याचा परमार्थ
विश्वसखा तो कृपांकित खरा तया साधला निजस्वार्थ!
गुरुवारीच्या भल्या पहाटे जागवले मज बैसवले
श्रीरामाचे भाग्य उदेले दत्ताने अपुला म्हटले!
।।श्रीगुरुदेवदत्त।।
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:
Post a Comment