सुख देत घेत तू जगत राहा
प्रपंचात परमार्थ पहा!ध्रु.
आसक्ती मूळच दुःखाचे
वैराग्याने उपटायाचे
कर्मफळाची नको स्पृहा!१
मायतात रखुमाई विठ्ठल
श्रद्धा राहो अशीच निश्चल
पुंडलीक होऊन पहा!२
भोगाचे सुख भंगुर आहे
त्यागाचे सुख अनुपम आहे
सोसुन कळ तू हसत रहा!३
सगळे देणे भगवंताचे
अविरत वितरण करावयाचे
करुनि अकर्ता होय पहा!४
समर्पणाची साधच संधी
काय करिल मग आधिव्याधी?
आत्मचिंतनी दंग राहा!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवलेसुख देत घेत तू जगत राहा
प्रपंचात परमार्थ पहा!ध्रु.
आसक्ती मूळच दुःखाचे
वैराग्याने उपटायाचे
कर्मफळाची नको स्पृहा!१
मायतात रखुमाई विठ्ठल
श्रद्धा राहो अशीच निश्चल
पुंडलीक होऊन पहा!२
भोगाचे सुख भंगुर आहे
त्यागाचे सुख अनुपम आहे
सोसुन कळ तू हसत रहा!३
सगळे देणे भगवंताचे
अविरत वितरण करावयाचे
करुनि अकर्ता होय पहा!४
समर्पणाची साधच संधी
काय करिल मग आधिव्याधी?
आत्मचिंतनी दंग राहा!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
प्रपंचात परमार्थ पहा!ध्रु.
आसक्ती मूळच दुःखाचे
वैराग्याने उपटायाचे
कर्मफळाची नको स्पृहा!१
मायतात रखुमाई विठ्ठल
श्रद्धा राहो अशीच निश्चल
पुंडलीक होऊन पहा!२
भोगाचे सुख भंगुर आहे
त्यागाचे सुख अनुपम आहे
सोसुन कळ तू हसत रहा!३
सगळे देणे भगवंताचे
अविरत वितरण करावयाचे
करुनि अकर्ता होय पहा!४
समर्पणाची साधच संधी
काय करिल मग आधिव्याधी?
आत्मचिंतनी दंग राहा!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवलेसुख देत घेत तू जगत राहा
प्रपंचात परमार्थ पहा!ध्रु.
आसक्ती मूळच दुःखाचे
वैराग्याने उपटायाचे
कर्मफळाची नको स्पृहा!१
मायतात रखुमाई विठ्ठल
श्रद्धा राहो अशीच निश्चल
पुंडलीक होऊन पहा!२
भोगाचे सुख भंगुर आहे
त्यागाचे सुख अनुपम आहे
सोसुन कळ तू हसत रहा!३
सगळे देणे भगवंताचे
अविरत वितरण करावयाचे
करुनि अकर्ता होय पहा!४
समर्पणाची साधच संधी
काय करिल मग आधिव्याधी?
आत्मचिंतनी दंग राहा!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment