छत्रपतींच्या गादीला या त्रिवार माझा मुजरा!
त्रिवार माझा मुजरा! ध्रु.
मुक्ति लाभता येथे आलो
शिवस्मृतीने पावन झालो
शक्तिकेंद्र हे प्रभावशाली प्रत्यय आला पुरा!१
स्वराज्यसंस्थापक जो होता
गोब्राह्मणप्रतिपालक नेता
छत्रपतींच्या आशीर्वचना अत्युत्सुक मी खरा!२
राज्य हिंदवी जये स्थापिले
बादशहाला खडे चारिले
त्या आदर्शा हृदी बिंबण्या नमिले मी नरवरा!३
हिंदुध्वज प्राणांहुनि प्यारा
उधाण आणित मनःसागरा
वंदन करण्या ध्वजराजासी खाली झुकल्या नजरा!४
तलवारीचे सुतीक्ष्ण पाते
शत्रुमनी थरकाप उडविते
युयुत्सु मन हे नम्र होउनी वंदित गुणगंभीरा!५
श्रीशिवराया साक्ष ठेवुनी
पाउल ठेवी राजकारणी
शक्ती युक्ती धृति नीतींनी वरिले वीरवरा!६
सर्वप्रथम कर्तव्य हेच ते
आदरभावे मस्तक लवते
नसानसातुनि चैतन्याचा खळखळताहे झरा!७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:
Post a Comment