स्वराज्य हे जन्मले! शिवाला सिंहासन लाभले!
स्वर्गसुख रायगडी पोचले ! ध्रु.
उजळति ज्योती, घुमत चौघडा
प्राजक्ताचा सुगंधी सडा
मनी दरवळे धुंद केवडा
शिवा मस्तकी छत्र पाहता उद्यापन जाहले ! १
स्वराज्यात आणविल्या सरिता
जणू इच्छिती अपुलि मुक्तता
मनोमनी शिव वचनि गुंतता
तुषार त्या साती गंगांचे हर्षभरे हासले ! २
वंदन करण्या शिवबा झुकला
कर थरथरता पृष्ठी फिरला
वात्सल्याचा गंध आगळा
आशीर्वच मातेचे पावन तीर्थोदक वाटले ! ३
पदस्पर्श कौशल्ये टाळुन
श्रीशिव भूषवि ते सिंहासन
सुवर्ण अधिकचि गेले उजळुन
शिंगे, कर्णे, ताशे, सनया नाद हि कल्लोळले ! ४
दणदणाट तोफांचा झाला
बधीरता ये झणि शत्रूला
फिरंगाहि अंतरि बावरला
सौभाग्याचा असा सोहळा शिवमंगल जाहले ! ५
सुलतानाची मिरास सरली
इच्छांची परिपूर्ती झाली
धर्माते जगि लाभे वाली
चार पातशाह्यांते हरवुन सिंहासन स्थापिले ! ६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
स्वर्गसुख रायगडी पोचले ! ध्रु.
उजळति ज्योती, घुमत चौघडा
प्राजक्ताचा सुगंधी सडा
मनी दरवळे धुंद केवडा
शिवा मस्तकी छत्र पाहता उद्यापन जाहले ! १
स्वराज्यात आणविल्या सरिता
जणू इच्छिती अपुलि मुक्तता
मनोमनी शिव वचनि गुंतता
तुषार त्या साती गंगांचे हर्षभरे हासले ! २
वंदन करण्या शिवबा झुकला
कर थरथरता पृष्ठी फिरला
वात्सल्याचा गंध आगळा
आशीर्वच मातेचे पावन तीर्थोदक वाटले ! ३
पदस्पर्श कौशल्ये टाळुन
श्रीशिव भूषवि ते सिंहासन
सुवर्ण अधिकचि गेले उजळुन
शिंगे, कर्णे, ताशे, सनया नाद हि कल्लोळले ! ४
दणदणाट तोफांचा झाला
बधीरता ये झणि शत्रूला
फिरंगाहि अंतरि बावरला
सौभाग्याचा असा सोहळा शिवमंगल जाहले ! ५
सुलतानाची मिरास सरली
इच्छांची परिपूर्ती झाली
धर्माते जगि लाभे वाली
चार पातशाह्यांते हरवुन सिंहासन स्थापिले ! ६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment