आरति सोऽहम् ची गाऊ!
आता आसनस्थ होऊ! ध्रु.
आता आसनस्थ होऊ! ध्रु.
सोऽहम् भावे
हरिसी ध्यावे
श्रीहरि अंतरात पाहू!१
सोऽहम् ज्ञाने
होइल सोने
जीवन हरिचरणी वाहू!२
सोऽहम् स्मरता
वरे धन्यता
सत्वर स्वस्थचित्त होऊ!३
इंद्रिये मना
मन मग पवना
संगे गगनि झेप घेऊ!४
गुरुचे देणे
अमोल लेणे
उजाळा अभ्यासे देऊ!५
हा अजपाजप
हटवी आतप
ऐशा सावलीत येऊ!६
सोऽहम् संगे
रामहि रंगे
सोहळा पुन:पुन्हा पाहू!७
सोहळा पुन:पुन्हा पाहू!७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२३.०८.१९७७
No comments:
Post a Comment