Friday, March 4, 2022

तोच मी!

तोच मी!
हे अनुसंधान टिकावे.  मी देह नव्हे. मन नव्हे, बुद्धि नव्हे. मी शुद्ध आनंदरूप आत्मा आहे..
***************

तोच मी! तोच मी! तोच मी!
घोकणे नेहमी! घोकणे नेहमी!ध्रु.

देह नाहीच मी
मनहि नाहीच मी
शुद्ध आनंद मी! शुद्ध आनंद मी!१

आत आनंद तो
विश्वि आनंद तो
युक्त मी! मुक्त मी! मुक्त मी!२

निश्चयाचे बळ
लाभते हे फळ
गात राही जिवा! तोच मी! तोच मी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.१०.१९७७
भीमपलास, आधा ताल
(स्वकुल तारक)

No comments:

Post a Comment