हरिपाठावर अण्णांनी ५६ गीतं लिहिली आहेत त्यातली ही भैरवी
जो जपे हरिला सदा
पोचला हरिच्या पदा! ध्रु.
“हरि हरि” म्हणता मीपण विरले
अंतरंग हरिसदन जाहले
दु:ख ना शिवते कदा! १
हरिपाठाचे चिंतन घडले
साधुनिया हरिनाम घेतले
खुंटली उपाधि यदा! २
पवित्र गाणे वदनी आले
श्रीहरिदर्शन घडले घडले
प्रभुचरणि रत जो सदा! ३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
भैरवी (जो भजे हरि को सदा..)
०९.०८.१९७७
No comments:
Post a Comment