भगवंत आपला पिता नि माता
(चला तया) वंदू! भावभरे वंदू!ध्रु.
सद्बुद्धीचा श्रीहरि दाता
कृष्णच कर्ता कृष्ण करविता
सौख्याने नांदू!१
नरनारी हा भेद वरिवरी
परस्परांचे ते सहकारी
आत्मोन्नति साधू!२
गृहस्थ जणु हा श्रीनारायण
गृहिणी लक्ष्मी भक्तिपरायण
जोडीला वंदू!३
बंधू भगिनी पवित्र नाते
शिकवी प्रेमे वागायाते
देव असा शोधू!४
चुकता चुकता शिकता येते
नित्यचिंतने प्रगती घडते
सुधारणा साधू!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment