Sunday, December 25, 2022

इतना कहना तुम मानो अपने आपको पहचानो

इतना कहना तुम मानो 
अपने आपको पहचानो!ध्रु. 

पार्थ ना केवल पार्थिव है
तेजोनिधि रवि औ शशी है 
बात पते की तुम जानो!१ 

तुम ना कर्ता, भोक्ता हो 
तुम ना कायर बंदी हो 
असीम आत्मा को जानो!२ 

जनन मरण स्वाभाविक है
सहना भी सुखदायक है 
खडे रहो सीना तानो!३ 

जो होगा होता ही है 
अनुचित पीठ दिखाना है 
शशक नही तुम सिंह बनो!४ 

कोऽहं क्या यह सवाल है 
सोऽहं केवल जबाब है
ज्ञानी हो तुम योगी बनो!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०७.२००४

Saturday, December 24, 2022

शिक्षेचा मी प्रहार हसत झेलला



दोन अलग जन्‍मठेपि जगाआगळा 
शिक्षेचा मी प्रहार हसत झेलला!ध्रु. 

पुनर्जन्‍म सिद्धांता मिळत मान्‍यता 
शासन हे जरि विदेशी हिंदु तत्त्वत: 
शिक्षेचे साहचर्य नित्‍यची मला!१  

योगसूत्र म्‍हणत मनी करिन चिंतना 
भोजनांति मी करीन ध्‍यानधारणा 
मायभूमि वंद्य नित्‍य सस्‍य श्‍यामला!२  

अर्धशतक अर्धशतक घाव मस्‍तकी 
छिन्‍न भिन्‍न जीवन मम येत ध्‍यानि की 
नीलकंठसम पचविन मी हलाहला!३  

काव्‍याचा विषय अता मीच जाहलो 
मीच ध्‍येय मी ध्‍याता येथ राहिलो 
या योगा विश्वांतरि अन्‍य ना तुला!४  

सूडाचे चक्र येथ फिरत गरगरा 
न्‍यायदेवताच भ्रष्‍ट छळत नरवरा 
न्‍यायदान नावाचा खेळ मांडला!५  

मृत्‍युंजय जो असतो मरत ना कधी 
त्‍यास मारणारा नच संभवे कधी 
अनादि मी अनंत मी अवध्‍य मी भला!६  

आपुल्‍याच मरणाने राज्‍य हे सरे 
दास्‍यमुक्‍त राष्‍ट्र मात्र मागुती उरे 
सत्‍याचा सूर्य तिमिरि मीच पाहिला!७  

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 

(स्‍वातंत्र्यवीर सावरकरांना  २४ डिसेंबर १९१० या दिवशी काळ्या पाण्‍याची शिक्षा ठोठावण्‍यात आली होती त्‍या प्रसंगावर आधारित हे काव्‍य)

Friday, December 23, 2022

श्रम कर सुख मिळेल



अंग जरा राबू दे, घाम गळू दे
घाम असा गळुन गळुन भूक लागू दे!ध्रु.

हालचाल करत रहा
बिजलीसम लवत रहा
पीक डुले शेती ते बघत राहु दे!१

मातीचा स्पर्श हवा
कष्टाचा सोस हवा
श्रमिकाला श्याम असा नित्य भेटु दे!२

बागकाम करा फिरा
मोदाचा आत झरा
सौख्याचा मंत्र असा नित्य स्फुरू दे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

संसाराच्या दुःखावरती विजय मिळविते भक्ती!

संसाराच्या दुःखावरती विजय मिळविते भक्ती! 
विजय मिळविते भक्ती!ध्रु.

दुःखाने भगवंत स्मरला 
त्या दुःखाते कैसा विटला 
कोसळोत शिरि भव्य दुःखगिरि सहण्या येइल शक्ती!१

पांडव जरि ते नित वनवासी
परि आठविती श्रीकृष्णासी 
कधी न पडावा विसर हरीचा म्हणती शुद्धमती!२

सुख भ्रामक मृगजळ हे दुसरे 
पाऱ्यासम तळहाती न ठरे 
देव ठेवितो जैसे अपणा तैसे असणे शांती!३ 

स्वाभाविकि आवडी असावी
कृत्रिमतेची ओढ नसावी 
नियुक्त कर्मे अविरत करणे श्रेष्ठ साधना जगती!४ 

आत्मस्थित जो साधक होई
सुखदुःखांच्या अतीत जाई
संतांचे ते असे सुलक्षण द्वंद्वातीत स्थिति ती!५

शरण गेलिया जगदंबेते 
कळिकाळाचे भय ना उरते 
वज्रासम मग कणखर ते मन देही भोगत मुक्ती!६

जर वाटे दुःखा जिंकावे 
तनामनाने संतच व्हावे 
अनुकरणातुनि नकळत कधितरि घडते शिल्पाकृती!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रावर आधारित हे एक काव्य.

Tuesday, December 20, 2022

आलो शरण स्‍वरूपानन्‍दा


ठाव चरणिं मज द्यावा
आलो शरण स्‍वरूपानन्‍दा ! ध्रु. 

सोऽहं ध्‍यानी प्रगती व्‍हावी 
या देही मुक्‍ती लाभावी 
वन्‍दन पदारविन्‍दा! १ 

उदात्तता आचरणी यावी 
मार्दवता भाषणी खुलावी 
मूर्तिमन्‍त आनन्‍दा! २ 

विशालता द्या, निर्मळता द्या 
अगाधता द्या, जिज्ञासा द्या
वितरा मोदमरन्‍दा! ३ 

देहभावना विलया जावी 
सोऽहं जाणिव फुलुनी यावी 
शिकवा या मतिमंदा! ४ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
२३.०३.१९७४

Sunday, December 18, 2022

प्रपंच आणि परमार्थ

 

प्रपंच हा होतच असतो, परमार्थ करावा लागे! 
देहास भुले तो गुरफटला, आत्माच स्मरावा लागे!ध्रु. 

जन्म नि मरण संसार आत्माच एक परि सार 
अभिमान भेद करणार परमार्थि न भेदविकार 
मी कर्ता हे अज्ञान जाणूनि सद्गुरू वागे!१
 
मी कर्ता फल मज हाव त्या प्रपंच ऐसे नाव 
तो कर्ता फलही त्याचे परमार्थी ऐसा भाव 
देहात असूनी नाही मग लेपहि कुठला लागे!२
 
कर्तव्य म्हणुनि कर काम, मुखि असो हरीचे नाम 
मन सहज बने निष्काम, ते सदन शांतिचे धाम 
नाथा घरी चंदन घासे दाविले स्वये श्रीरंगे!३
 
द्वैताच्या पायावरती हा प्रपंच नामक इमला 
सोऽहंचा गंध अमंद परमार्थी दरवळलेला 
हरिनाम सर्व हरि दोष हरिपाठी ज्ञाना सांगे!४
 
जो सजता सजता विटतो तो प्रपंच मायाजाल 
परमार्थ करू जाताना मन बनते सहज विशाल 
हे विश्व निकेतन माझे अदृश्य रेशमी धागे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, December 15, 2022

स्वरूपसंध्या



सायंकाळी स्वरूप स्मरता
भिरभिरते मन विसावते।
आनंदाचा उगम अंतरी
गुरुकृपेने त्या कळते।।१।।

नित्यपाठ तो नित्य वाचता
ओवी ओवी मनि मुरते।
सामूहिक या अभ्यासाने
माझी काया मोहरते।।२।।

मन पवनाला जोडुन देता
मस्तक थोडे जड होते।
कृपाहस्त मस्तकी गुरूंचा
ऐहिकास मन विस्मरते।।३।।

घर हो पावस घर आळंदी
समाधिमंदिर घर बनले 
आता मैत्री चराचराशी
पालटले मन पालटले।।४।।

नित्यच मजला गुरुपौर्णिमा
प्रासादिकता ये वचनी।
भजनकेंद्र चालवा निरंतर
श्रीरामा ठेवाच ऋणी।।५।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

स्वरूपप्रभात

 

मना नाम घे तू मनाशी निवांत
पहा आत झाली स्वरूपप्रभात! ध्रु. 

गुरुमाउली ती कशी पाहते ते 
मने मूल झाला तया जाणवे ते
जरी शब्द ना सूर ते गीत गात!१

कसा मंद वारा कसे गोड ऊन 
विठाई कशी घे मुला सावरून 
अलंकापुरी नांदते पावसेत!२

कसे ध्यान लागे तुला काय चिंता
पहा सद्गुरू तो निवारी अहंता 
दुजाभाव ना तो असा भक्तिप्रांत!३

असा नेम तू नित्य लावून घ्यावा
प्रभाते मनी नाथ चिंतीत जावा
खरा मोद नांदे तुझ्या आत आत!४

जरी अज्ञ श्रीराम तो आर्त झाला
वदे साई स्वामी विसावा मिळाला
समाधीत लाभो तया साधुबोध!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, December 13, 2022

रामा, सर्व भार तुजवरी!

रामा, सर्व भार तुजवरी!ध्रु.

देह वाहिला तुझ्याच चरणी
मन गुंतविले तुझिया भजनी
करिन अशी चाकरी!१

तुला स्मरावे तुज पूजावे
सर्वांभूती तुजसि पहावे
रहा सदा अंतरी!२

तुझ्या संगती कष्ट सौख्यमय
तव विरहाने विलास विषमय
हीहि तुझी वैखरी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २९८, २४ ऑक्टोबर वर आधारित काव्य)

तुझा विसर न व्हावा रामा, हाच वर द्यावा!

तुझा विसर न व्हावा
रामा, हाच वर द्यावा!ध्रु.

व्हावे सर्वस्वी अर्पण
आम्ही तुज दयाघन
मग कृपेचा श्रावण घनघोर बरसावा!१

अनुसंधान राहू दे
पूर्ण निश्चिंत होऊ दे
अहंकारवारा रामा तुझ्या दासा न लागावा!२

मन ऐसे व्हावे धीट
मानो विषयाचा वीट
वाढो तुझ्या नामी प्रीती जोर साधनेत यावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २९४, २० ऑक्टोबर वर आधारित काव्य)

आवरेना मन, म्हणूनि शरण

आवरेना मन, म्हणूनि शरण
येउनि राघवा धरिले चरण!ध्रु.

कैसा भेटशील?
कैसा पावशील?
ध्यास हाच लागे मज रात्रंदिन!१

मन जेथ गुंते
रहा देवा तेथे
विषयच व्हावा मला नारायण!२

प्रपंच नामात
देवा तूहि त्यात
भजनात लाभो सौख्य समाधान!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २६६, २२ सप्टेंबर वर आधारित काव्य)

माझ्यात राम आहे विश्वात तोच आहे!

माझ्यात राम आहे
विश्वात तोच आहे!ध्रु.

भगवंत अंतरात
भरला कणाकणात 
फुलण्यात हासताहे!१

माझेपणा सुटावा
मी कोण? बोध व्हावा
विश्वी मलाच पाहे!२

जगि राम हाच कर्ता
जगि राम हाच भर्ता
हे तोचि बोधताहे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २७६, २६ ऑक्टोबर वर आधारित काव्य)

तुजशी बोलावे, तुझे नाम घ्यावे

तुजशी बोलावे, तुझे नाम घ्यावे
गाता गाता नकळत माझे मीपण लोपावे!ध्रु.

असे ऐकले नामामागे
तुजला धावत यावे लागे
जीवन माझे तुझिया स्मरणे सार्थकि लागावे!१

वाचा लाभे नाम गावया
चित्त लाभले तुजसी ध्याया
अतूट नाते म्यां भक्ताने तुजसी जोडावे!२

बहिरंगा भुलतसे विकारी
अंतरंग पाही अधिकारी
आत्मारामा अंतरात मी तुजसी निरखावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २५७, १३ सप्टेंबर वर आधारित काव्य)

गुरुदेवा, मज हा वर द्यावा

गुरुदेवा, मज हा वर द्यावा 
सुसंवाद अपुल्याशी व्हावा!ध्रु.

अभ्यासाची आवड लागो 
न्यायनीतिने मानस वागो 
दत्तनाम हा परमविसावा!१
 
नयन मिटावे दर्शन व्हावे 
अंत:करणी आपण यावे 
आचरणी ओलावा यावा!२ 

स्वस्थ आसनी बसता बसता 
उपासना ही सहज वाढता 
भक्तिमार्ग ना कधी सुटावा!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.०२.१९८६
(श्रीसद्गुरु साधक सुसंवाद या पुस्तकावरून सुचलेलं काव्य)

Sunday, December 11, 2022

जहां तहां सोऽहम् सोऽहम्

रैन गई और हुआ सबेरा 
मनपंछी गाता सोऽहम्
स्वस्वरूप का स्मरण करो
सुन पाओगे तुम सोऽहम् 
जहां तहां सोऽहम् सोऽहम्। 

सद्गुरुनाथ, मंगलनाथ 
जय नवनाथ, जय श्रीनाथ 
मिटी पहेली अब कोऽहम्। 

डाल डाल पर सुमन खिले 
भाव सुमंगल आके मिले
गूंजी शहनाई सोऽहम्। 

भाग्य उसी का जो जागा 
दूर दूर भवभय भागा 
मनसे पुकारो धन्योऽहम्।

सुन पाओगे तुम सोऽहम्
जहां तहां सोहम सोऽहम्।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१८.०७.२००४

आठवणीतील गुरुदेवा

आठवणीतील गुरुदेवा 
करवुनि घ्या काही सेवा!ध्रु. 

धर्म सनातन, त्याचे पालन 
श्री गुरुपूजन शुद्ध आचरण
स्वरूपचिंतन हा मेवा!१ 

बसल्या ठायी येते जाता 
शरीर हे रोमांचित होता 
देता दर्शन गुरुदेवा!२ 

कर्ता भोक्ता श्रीनारायण 
स्वस्थ बसावे शिकवी वामन 
अनुग्रहच आहे बरवा!३ 

करुणाकर ही वामनमूर्ती 
वर्ण केतकी सुवर्णकांती 
रसाळ गाणी नित लिहवा!४

अन्न ब्रह्म हे प्रसाद बोले 
आनंदाने डोळे भरले 
कृतज्ञ आम्ही गुरुदेवा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६.०६.२००७

मला माधवा सर्व गीता कळावी



"करू काय" हा प्रश्न जेव्हा छळे तो
स्वये जोडुनी हात मी पार्थ होतो
अहंता हरी औषधाला नुरावी 
मला माधवा सर्व गीता कळावी!१
 
यशे होत वेडा अलाभे खचे मी 
कुणी आप्त जाता रडे मी झुरे मी 
परी आत्मसत्ता कळावी वळावी 
मला माधवा सर्व गीता कळावी!२
 
करी कर्म तेव्हा तुझ्या आठवाने 
स्फुरो नाम कृष्णा असे आर्ततेने
सुयोगे अशा चित्तशुद्धी घडावी 
मला माधवा सर्व गीता कळावी!३
 
अरूपा तुझे रूप ते जाणवावे 
गुणातीत तू, मी तुला आळवावे 
तुझी बासरी आत सोऽहं घुमावी 
मला माधवा सर्व गीता कळावी!४

जसा थेंबुटा तो समुद्री बुडाला 
तसा एकला तो अनेकी रिघाला
विनंती अशी खिन्नता लुप्त व्हावी 
मला माधवा सर्व गीता कळावी!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०७.०२.१९८३

राम कर्ता, राम कर्ता ही असू दे भावना

राम कर्ता, राम कर्ता ही असू दे भावना
नाहिशा होतात तत्क्षणि शोक, चिंता, वासना!ध्रु.

नाम देते राम हाती
नाम राही नित्य पाठी
राहु नामी निश्चयो हा तुष्ट करितो तनमना!१

राम म्हणता काम आटे
शूल ही मग पुष्प वाटे
द्वंद्व मिटता देव भेटे - काळजी नारायणा!२

नाम ऐसे शस्त्र आहे
विषयप्रेमा जाळताहे
आग होते शांत सारी गंध लाभे चंदना!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २२१, ८ ऑगस्ट वर आधारित काव्य)

इथे तिथे तू भगवंता मीहि तूच तू भगवंता..

इथे तिथे तू भगवंता
मीहि तूच तू भगवंता!ध्रु.

दुःख कशाला
सुखमय त्याला
एकभाव ऐसा ठसता!१

भाव प्रबळे
शब्द पांगुळे
आनंदाश्रू हे झरता!२

गुरुची आज्ञा
सकला मान्या
तिच्यात दिसशी भगवंता!३

नामचि घ्यावे
काम करावे
कर्तव्य हि तू भगवंता!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २१६, ३ ऑगस्ट वर आधारित काव्य)
भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे.

चित्त शुद्ध होण्या प्रभूसी भजावे..

चित्त शुद्ध होण्या प्रभूसी भजावे!ध्रु.

दोष दुसऱ्याचा दिसू नये डोळा
चित्ति जागा व्हावा भक्तिभाव भोळा
याचसाठि रामा शरण रिघावे!१

दासबोध हाच सांप्रत सत्संग
बोध बाणताच भक्तिस ये रंग
साधुपण अंगी हळू मुरवावे!२

साधनात मज सद्गुरु दिसावा
आचरणी बोध काही तरी यावा
आयुष्यच सारे तीर्थयात्रा व्हावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २०१, १९ जुलै वर आधारित काव्य)
सद्गुरु ने सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच गुरुभेटीचे सार्थक होते.

Wednesday, December 7, 2022

दत्तात्रय पाठीशी असता का करिशी चिंता?

दत्तात्रय पाठीशी असता 
का करिशी चिंता? ध्रु. 

दत्त दत्त म्‍हण 
मन हो उन्‍मन 
सोडी चंचलता! १ 

विचार सुचती 
प्रश्‍नहि सुटती 
तो तुज सावरता! २ 

स्‍मर दत्ता रे 
दत्त तुझा रे 
दत्ताची सत्ता! ३ 

दत्तच कर्ता 
दत्त करविता 
ध्‍यानी धर आता! ४ 

अशुभ टळतसे 
शुभच होतसे 
दत्त दत्त जपता! ५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
२४.०१.१९८९ 
नारायण महाराज केडगाव यांच्‍या चरित्रावर आधारित काव्‍यामधील हे एक काव्‍य

दर्शनास आलो दत्ता

दर्शनास आलो दत्ता, इथे शांत वाटे
इथे शांत वाटे, दत्ता समाधान होते! ध्रु

"दत्त, दत्त," जप हा चाले
चित्त पदी सुस्थिर झाले
भावभरे भरतो ऊर कंठ मात्र दाटे!१

जटाजूट शोभे माथी
करी माळ आणिक पोथी
सुवेष हा अपुला दिसता जुळे गोड नाते!२

कमंडलूमधले नीर
अधीरास बनवी धीर
भलेबुरे सोसत जावे चक्र पाठ देते!३

कामक्रोध अंकित होता
नाग रुळे कंठी दत्ता
भस्म चर्चिता अंगाला पाप भस्म होते!४

शंखनाद सोऽहं गमतो
दीर्घकाळ साधक बसतो
मंत्रमुग्ध होण्यासाठी स्मरण साह्य देते!५

रचयिता :: श्रीराम बाळकृष्ण आठवले
२९.०१.१९८९
नारायण महाराज केडगाव यांच्या चरित्रावर आधारित काव्यातील हे एक काव्य

माझा भार दत्तावरी! तो परमहिताचे करी!


माझा भार दत्तावरी!  
तो परमहिताचे करी! ध्रु. 

दत्त फिरवितो तैसा फिरतो 
दत्त वदवितो तैसा वदतो 
झोळी खांद्यावरी! १ 

दत्तनाम या मुखात येते 
तहान सरते, भूक न उरते 
छत्र मस्‍तकावरी! २

तन दत्ताचे मन दत्ताचे 
मन दत्ताचे धन दत्ताचे 
दत्त वदे वैखरी! ३

मी माझेपण नकळत सरते 
कणकण काया मम मोहरते 
नयनी अश्रूसरी! ४

जेथे जातो दत्तच तेथे 
गुरुदत्ताची प्रचीति येते 
नाचतात लहरी! ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
२४.०१.१९८९ 
नारायण महाराज केडगाव यांच्‍या चरित्रावरील काव्‍यातील हे एक काव्‍य

अनन्‍यभावे शरण तुला मी, आलो श्रीरामा!



गोंदवलेकर महाराज प्रवचन १८७, ५ जुलै वर आधारित काव्‍य 

अनन्‍यभावे शरण तुला मी, आलो श्रीरामा! ध्रु.

अशीच सेवा करवुनि घेई 
हीच विनवणी तुझिया पायी 
दर्शन मिळण्‍या सुपात्र ठरण्‍या उच्‍चारिन नामा! १

घरातला तू कुणी वाटते
अबोध काही जुळले नाते 
सुखदु:खे सांगावी तुजला रे गुणैकधामा! २

प्रारब्‍धाचे भोग ललाटी 
विधिने जे जे लिहिले असती 
भोगण्‍यास दे अपार शक्‍ती, नामी दे प्रेमा! ३

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

Monday, December 5, 2022

सोडुनि दे नोकरी, गणू रे सोड सोड नोकरी!ध्रु.

सोडुनि दे नोकरी, गणू रे सोड सोड नोकरी!ध्रु. 

बूट पुसाया काय जन्‍मलो? 

विसरलास का येथे आलो! 

करावी रामाची चाकरी! १ 


तुझी काळजी भगवंताला 

कारण नसता भिसी कशाला? 

ठेवि तव ओझे रामावरी! २ 


कल्‍याणास्‍तव तुझ्या सांगतो 

पांगुळगाडा टाकुनि दे तो 

पंगु हि लंघित गिरी! ३ 


कवित्‍व आहे तुझ्या ठिकाणी 

ते लावावे रामकारणी 

संकीर्तन तू करी! ४ 


मोह सोड तू अशाश्‍वताचा 

करि विचार तू “मी कोणाचा?”

हो जागृत झडकरी! ५ 


रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 


भूपाळी श्रीकृष्णाची


प्रभातकाली तुझी बासरी मधुर मधुर ऐकली! 
शीणभाग सरलासे सारा सुखद जाग आली!ध्रु. 

श्रीकृष्णा तव हसरी मुद्रा अवचित मज दिसली 
अनुभूतीने अंगांगावर रोमावलि उठली
हसतमुख सदा त्या संतांना श्रीगीता कळली!१

गीता गाता भान हरपते साधे समरसता 
विषाद सरला प्रसादलाभे अनुग्रहच घडता 
मस्तक लवले कृतज्ञतेने नयनदले भिजली!२
 
उद्धारावे आपण अपणा विवेक हा सोबती 
विकारविलसित जाता विलया उरली विश्रांती 
नित्य नवा दिस साधकवृंदा दसरा दीपावली!३ 

श्यामसुंदरा, हे घननीळा कसा लागला लळा 
सदनोसदनी आला बहरा भक्तीचाच मळा 
आपआपली कामे करण्या जनता सरसावली!४ 

पीतांबर कसणारा शेला हिरवागार भला 
गोड गुलाबी उपरणे तसे साजे तव तनुला
श्रीरामाच्या मनोमंदिरी कृष्णमूर्ति ठाकली!५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०६.०७.२००९

आरती श्रीकृष्णाची

जय देव जय देव जय जय श्रीकृष्णा
आरति ओवाळिता  नयनी गंगायमुना!ध्रु. 

गोप नि गोपी आम्ही जन्मोजन्मीचे
आतुरलो श्रवणाला भगवद्गीतेचे
कर्मयोगाला कोठे ना तुलना!१ 

हे मुरलीधर गिरिधर गोंडस गोविंदा
पापवासनांचा कर चेंदामेंदा
आनंदकंदा श्रीनंदनंदना!२ 

हासत खेळत जगणे जीवन या नाव
अवखळ त्या मनाला अभ्यासा लाव
फुंकर घालुनि वाजव मुरली मोहना!३

थोरांमाजी थोर थोर सानांत सान
गवळी गोपगडी तू कृष्ण किसान
चराचरामध्ये तुझी चेतना!४ 

समाधान हाच योगांचा योग 
तोच घालवितो रोगांचा रोग 
धन्वंतरी रामा जगदीशा कृष्णा!५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, December 4, 2022

सज्जनगडला चला


सज्जनगडला चला, 
सुजन हो, सज्जनगडला चला!ध्रु.

वायुलहर अंगावर येते 
पाउल भरभर पुढती पडते 
चिंतन करुया चला!१ 

समर्थ जेथे, मारुती तेथे 
मारुती तेथे, राघव भेटे 
अनुभव घ्या, घ्या, चला!२ 

चढण चढाया सोपी जाई 
रामदास गुरु संगे राही 
नेट धरुया चला!३ 

केविलवाणे कशास व्हावे 
यत्न देव पुरते जाणावे
स्तोत्र आळवा चला!४

थंडीही उबदार होतसे 
पाऊस गुलाबपाणी भासे 
हासत खेळत चला!५ 
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१८.१०.२००४

आहेस तू, नाहीच मी



गोंदवलेकर महाराज प्रवचन २५३, ९ सप्‍टेंबर वर आधारित काव्‍य 
("तू आहेस, मी नाही" ही स्थिती जेव्‍हा नामस्‍मरणाच्‍या योगाने आपली होईल तेव्‍हाच परमेश्‍वर आपण जोडला किंवा मी परमेश्‍वराचा झाालो असे सार्थपणाने म्‍हणता येईल)

नाम घेता रमत रामीं 
बोल येती कुठुनि कानीं 
“आहेस तू, नाहीच मी” ! ध्रु. 

जे पहावे त्‍यात दिसशी 
श्रवणि यावे त्‍यात असशी 
बंध पडती पामराला मुक्‍त मी आनंद मी! १  

शरण जाण्‍या भीति कसली? 
नामरंगी भक्ति हसली 
देवबुद्धि सूर्य उगवे देह बुद्धीच्‍या तमीं ! २ 

ध्‍यास लागो रामराया 
आवरी तव घोर माया 
चंचला वृत्ति स्थिरावी मी रहावे सौख्‍यधामीं ! ३  

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

Wednesday, November 30, 2022

जोवरी जगाची आस, भगवंत न भेटे खास!


जोवरी जगाची आस, भगवंत न भेटे खास!ध्रु.

प्रभुवीण न कोणी दुसरा
जंजाळ जगाचा विसरा
बाणता अनन्या वृत्ती तात्काळ तुटे भवपाश!१

संपदा नको विद्वत्ता 
कुठलेहि कष्ट न करता
प्रेमेच  बाणते निष्ठा हृदि धरा भक्ति हव्यास!२

पांडवा सती पाचारी
हाक ना कुणी अवधारी
माधवा पोचता साद राखिले तये ब्रीदास!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रावर आधारित काव्यामधील हे एक काव्य)

चल मन गीता गाता, श्रवता आचर थोडी रे!


चल मन गीता गाता, श्रवता 
आचर थोडी रे!ध्रु. 

जीवन संगर 
हे ध्यानी धर 
टाळता न ये रे!१ 

गुणगंभीरा 
हे खंबीरा 
आत्मरूप स्मर रे!२ 

शोक कशाचा - 
या देहाचा? 
शाश्वत जाण बरे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२३.०९.१९७९

Tuesday, November 29, 2022

गीता वाचा


पठनेन तु गीताया: पाठकश्चिन्तको भवेत्। 
योगेशो हृदयात्तस्य  कार्यं कर्म समादिशेत्।।

अर्थ : गीतेच्या नियमित पठनाने ती वाचणारा स्वतः चिंतनशील होईल आणि अभ्यासानंतर त्याच्या अंत:करणातूनच योगेश्वर कृष्ण कोणते कर्म करणे योग्य ते सांगेल.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गीतादर्शन ऑगस्ट १९८४)

Friday, November 25, 2022

सागर नाचत था थय था थय



ब्रह्मानंदी जणु लागे लय 
सागर नाचत था थय था थय ! ध्रु. 

बुलंद किल्‍ला येथ असावा 
धाक रिपूच्‍या मनी वसावा 
सीमेवरच्‍या प्रजाजनांचा संसारहि राहू दे निर्भय! १  

स्‍वराज्‍य दुबळे नव्‍हे नव्‍हे हे 
वीरश्रीयुत वर्तन राहे 
शिवपदस्‍पर्शे कणकण द्वीपी जणू जाहला शिवमय शिवमय! २ 

वाजंत्री वाजती, वेदघोष चालला 
श्‍यामल पाषाणा पातली आज सुवर्णी कळा 
स्‍वर वाद्यांचा स्‍वर वेदांचा घुमू लागला जय स्‍वराज्‍य जय! ३ 

सूरत लुटली सोने मिळले 
प्रजारक्षणा कामी आले 
समाजसेवक शिवरायांचे जीवन अवघे होते यज्ञमय! ४

सिंधुदुर्ग या नावापोटी 
स्‍वप्‍ने दडली कोटी कोटी 
सागर शिवमय, शिव सागरमय लाटा गाती था थय था थय! ५  

जलदेवींनो शिव हा झुकला 
राज्‍य हिंदवी हे सांभाळा 
गोब्राह्मणप्रतिपालनकार्यी शिवनृपाचा लागतसे लय! ६ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

Wednesday, November 23, 2022

देव हवा मज वाटतसे

देव हवा मज, देव हवा मज, देव हवा मज वाटतसे 
प्रेम करावे, प्रेम करावे, प्रेम करावे वाटतसे! ध्रु.  

देवाशी संवाद करावा, देवच माझा प्राणविसावा 
देव पहावा, देवच ध्‍यावा देव भुलतसे भक्तिभावा 
देवाशी सहवास घडावा स्‍वप्‍न मनी मी रेखितसे! १  

सरळपणाच्‍या व्‍यवहाराने मनास काही ना खुपते 
देव दयाघन करतो पावन आतुन कोणी हे वदते 
संकटकाळी देव धाव घे सदा सर्वदा जाणतसे! २  

प्रेमभाव जर नित्‍य ठेवला कुणास पडते कुठे कमी 
देणारा तो देतच राहे देव सर्वदा देत हमी 
उपेक्षा न देवाची व्‍हावी लीन अपेक्षा हीच असे! ३ 

नामच आहे अमोघ साधन भगवंताला स्‍मरावया 
अशी प्रार्थना शिकवी प्रेमा सर्वाभूती करावया 
दयापूर तो देतो लोटुन जाणताच हे जाणतसे! ४ 

स्‍मरणे निघते अंतर उजळुन अवघड ते सोपे होते 
हृदयमंदिरी त्‍याची स्‍वारी रहावयाला ती येते 
अपूर्व अनुभव अनुपम अनुभव साधकास नित येत असे! ५
  
रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
१७.१०.१९८९
(ब्रदर लॉरेन्स यांच्या जीवनावर आधारित हे काव्य)

चंदनसम झिजले काका (काका महाराज उपळेकर यांच्या जीवनावर आधारित काव्य)

चंदनसम झिजले काका
तसेच परिमळले!ध्रु.

लेकरू हे माऊलीचे
ध्यान करिते श्रीहरीचे
मन गोविंदे वेधले!१

विरक्तीवरी त्यांची प्रीती
जगावेगळी जीवनरीती
परमहंस गमले!२

विवेकभास्कर हृदी तळपला
तापहीन परि जगास ठरला
प्रेमे डोळे डबडबले!३

नको मान वा नको उपाधी
सहजहि बसणे जणू समाधी
सुखसंवादी रंगले!४

स्मृतिसुमनांची अंजली
म्यां गुरुचरणी वाहिली
मन बहु भारावले!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.०९.१९७५

Tuesday, November 22, 2022

जीवनवीरा, हो युद्धोन्‍मुख, वृथाच का थबकला?



युद्ध का केले पाहिजे? हा विचार अर्जुनाच्‍या मनात पुरता बिंबला नव्‍हता.  अर्थात् त्‍याचे शंकानिरसन होई पर्यंत तो युद्ध करणार नव्‍हता. 

देहाच्‍या अन्‍य अवस्‍थांप्रमाणे मरण हीही एक स्‍वाभाविक अवस्‍था आहे हे भगवंतांनी सांगितलेच होते. 

दु:ख काय किंवा सुख काय – त्‍यांच्‍या शोक आणि हर्ष या परिणामांना शहाणा माणूस आवर घालत असतो. 

अर्जुनाला भगवंतांनी आत्‍मज्ञान करून दिले आणि त्‍याच्‍या जोडीलाच जगावे कसे किंबहुना मरावे कसे याचा बीजमंत्र सांगितला. 

त्‍यांनी सांगितलेला कर्मयोग हा तुलनात्मकदृष्‍ट्या आचरण्याला सोपा – कल्‍याणाचा मार्ग समजावून सांगताना भगवंतांची रसवंती फुलून आली. जणु अर्जुनाच्‍या मस्‍तकी पारिजातकाच्‍या फुलांची वृष्‍टीच झाली. 
***********

जीवनवीरा, हो युद्धोन्‍मुख, वृथाच का थबकला? 
पार्था, जाणुन घे ही कला! ध्रु. 

सुखदु:खांच्‍या झंजावाती 
स्थिरचित्ताची निश्चल पणती 
प्रकाश वितरत – धनंजया मग, उचल उचल पाउला! १

अल्‍प कृति नच जाते वाया 
परमार्थाचा ती तर पाया 
निश्चित बुद्धी हितैषिणी ती अनुसरतो तिज भला! २

कर्म आचरुन, फल न विचारी 
अनासक्त हो, हो अविकारी 
ऐसी समता येता चित्ती कोलाहल शमला! ३

कर्माहुनि ही प्रधान बुद्धी 
तिच्‍याच ठायी आश्रय शोधी 
हेतु फलाचे अतीव दुर्बल घातक मनुजाला! ४

पाप असो वा असो पुण्‍यही 
स्थितप्रज्ञ नित अलिप्‍त राही 
योग साधण्‍या व्‍हावे उत्‍सुक – ती तर जीवनकला! ५

पाऱ्यासम तव बुद्धि चंचला
समता मिळता होइल अचला 
तटतट तुटतिल कर्मबंधने – चल उठ समराला! ६

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
(गीत गीता)

मी तुषारे वंदिले!

 

वाहताना, मी न कळता अडखळूनी थांबले 
मी तुषारे वंदिले! ध्रु. 

ज्ञानदेवे योगिराजे जी समाधी साधली 
तीच माझ्या अंतरंगी वेदनांनी बांधली 
ज्ञानभक्‍ती एक जागी नवल ते मी पाहिले!१ 

वैष्‍णवांच्‍या डोळियांतुन अश्रुधारा वाहिल्‍या 
भाववेडी होउनी मी झेलल्‍या त्‍या झेलल्‍या 
तो न गेला, तो चिरंतन समजले ना उमजले!२ 

सगुणभक्‍ती दु:खमुक्‍ती सूत्र सोपे तो वदे 
त्‍याच छंदा, त्‍याच गीता आळवीले मी मुदे 
दुरिततिमिरा ज्ञानकिरणे एक निमिषी सारिले!३

दु:ख सरले, शल्‍य नुरले, मोदमूर्ती जाहले 
श्रेय मिळले, प्रेय मिळले, मी कृतार्था जाहले 
श्रीहरीच्‍या नामगजरे धुंदले वेडावले!४ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
(संजीवन समाधी सोहळ्याच्‍या वेळचे इंद्रयाणीचे मनोगत)

सोडुनिया गणगोत मागुती ज्ञानदेव चालले, चालले!

सोडुनिया गणगोत मागुती 
ज्ञानदेव चालले, चालले! ध्रु.  

आज्ञा द्यावी गुरुमाउली 
आळी माझी तुम्‍ही पुरवली 
गुरुकृपेने मीपण सगळे 
क्षणी स्‍वरूपी मिनले मिनले! १  

वोसंडुनिया निवृत्‍तीने 
उरी लावले बाळ देखणे 
स्‍फुंदस्‍फुंदला विरक्तयोगी 
उफाळुनी कढ वरती आले! २ 

पांडुरंग सामोरा आला 
कर धरुनि प्रेमे चालवला 
पायाजवळी घ्‍या हो देवा 
अपूर्व सुख भोगले भोगले! ३ 

बसे आसनी योगीराजा 
पावनता ये विकसित तेजा 
विशाल लोचन मिटुनी घेता 
एक अनामिक गंध दरवळे! ४ 

तोची कैवल्‍याचा पुतळा 
ज्ञान मूर्त तो परम जिव्‍हाळा 
आता ऐसे होणे नाही 
परब्रह्म ते निघून गेले! ५  
विश्व सकल पोरके जहाले! 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
(श्री संत ज्ञानेश्‍वर कथाकाव्‍य) 
 
  

Sunday, November 20, 2022

नाथा या सदनी यावे ऽऽ


नाथा या सदनी यावे ऽऽ
अंगणी निरूपण व्हावे!ध्रु.

सद्गुरु जनार्दनस्वामी 
एकाच्या अंतर्यामी 
असतेपण लोपुनि जावे!१ 

ओवी वा छंद अभंग 
आळविता ये श्रीरंग 
पदि पैंजण बांधुनि यावे!२ 

गिरिजेसह यावे नाथा 
श्रीखंड्या मनि आतुरता
सद्भावसुमन उमलावे!३
 
भारूड झपाटुन टाको 
संशया दिगंतरि फेको 
मज सुस्थिर बसता यावे!४ 

भक्तीचा रांजण भरता 
घरकुल हे पैठण बनता 
भवभय हे विलया जावे!५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०५.०२.१९९७

जीवनात या आहे राम अंतरातुनी बोले श्‍याम!


जीवनात या आहे राम 
अंतरातुनी बोले श्‍याम!ध्रु. 

भला जन्‍म हा तुला लाभला 
जीवनहेतु कळेल तुजला 
रामनाम घे कर रे काम! १

जो रडका रे तो अपशकुनी
भार भुईला कर्म न करुनी 
घाम गाळता प्रसन्न श्‍याम!२ 

सत्‍यमार्ग श्रीरामे वरिला 
कर्मयोग श्रीकृष्‍णे कथिला 
तो अनुसरिता मन सुखधाम!३ 

हिंमत धरता विघ्‍ने पळती 
चिंतन करता कोडी सुटती 
आदर्शच ते राम नि श्‍याम!४ 

विजयपताका श्रीरामाची 
गीतामुरली श्रीकृष्‍णाची 
पहा, ऐक दे दे अवधान!५ 

करि परिशीलन उजळे जीवन 
उजळे जीवन विरता मीपण 
आनंदाचे स्‍वरूप राम!६ 

कसली चिंता तुजला जाळी 
आठ्यांचे का जाळे भाळी 
हसत जगावे शिकवी श्‍याम!७ 

या देहातच देव नांदतो 
स्‍फूर्ती देतो कार्य करवितो 
सूत्रधार तो सांगे राम!८ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०८.०७.१९८९

घे अशी त्रिमूर्ती ध्यानी..

हा ब्रह्मा म्‍हणजे देह तो जगती आला! आला 
श्रीविष्‍णू पालनकर्ता शिव शासनास सजलेला! ध्रु.  

जल पृथ्‍वी वायु तेज आकाश एक झालेले 
तनु होउन भूमीवरती ब्रह्मा हे आले आले 
विसरतो न जीव महेशा अनुसंधानी तो रमला! १ 

तो पालनकर्ता विष्‍णु शिकवितो न्‍याय अन् नीती 
देहाला सांभाळावे व्‍यसनांनी होई माती
जर कोठे पाय घसरला श्रीशंकर करि शिक्षेला! २ 

‘मी देह न पहिला पाठ’ तो पुन्‍हा पुन्‍हा गिरवावा 
झिजणारे चंदन सांगे तो परोपकारि झिजावा 
आळसे गंजतो देह तो परिश्रमे कमवावा! ३ 

सहकारे कामे होती कलहाने होतो नाश 
स्‍वार्थाने मत्‍सर माजे ये गळ्यात मृत्‍यूपाश
सद्बुद्धि सावरे तोल सद्गुरु आत बसलेला! ४  

तू कशास होसी खिन्‍न उद्योगे सगळे होते 
अपयशेहि लाभे सिद्धी येतसे प्रचीती येथे 
तू सोडी लोभ फलाचा योगेश्वर सांगुन गेला! ५ 

‘मी करतो’ गर्व फुकाचा “करणार नाही” हा हट्ट 
प्रकृती घडविते कार्य भगवंता धर रे घट्ट 
निर्लेप गगन ते कैसे शिकविते धडा सकलांला! ६ 

मन धावतसे बाहेर वैराग्‍ये अंतरि वळवी 
शिव गंगाधरही तुजला प्रेमाने संयम शिकवी 
घे अशी त्रिमूर्ती ध्‍यानी जे कळले सांग जगाला! ७ 

गुरुदेवदत्त तू गाई कर सर्वस्‍वाचे दान 
देता नच सरते वित्त गा माणुसकीचे गान 
गुरुवार असा हा नित्‍य हृदयात हवा ठसलेला! ८ 

कल्‍पना : ज कृ देवधर 
शंब्‍दांकन : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
२९.०६.१९८९ 
योगिनी एकादशी (गुरुवार)

माझे मन राम‍च‍रणि नित्‍य राहते!



दु:ख असो सौख्‍य असो 
मजसि काय ते?
माझे मन राम‍च‍रणि नित्‍य राहते!ध्रु. 

नील गगन 
शीत पवन 
घननीळचि हास्‍य करी असे वाटते! १

स्‍मरत राम 
करित काम 
नकळत मज रामभजन सहज साधते! २

राम नाम 
सौख्‍य धाम 
घडते त्‍या मी निमित्त चित्त जाणते! ३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २६५, २१ सप्टेंबर वर आधारित काव्य)

Sunday, November 13, 2022

स्वरूपानंद मज दिसले पावस घरीच या वसले!

स्वरूपानंद मज दिसले 
पावस घरीच या वसले!ध्रु.

नयनदलेही सहजच मिटली 
बाह्य उपाधी अलगद सरली 
मानसी कमलपुष्प उमले!१ 

स्वामींची ती परिचित खोली
तीच शांतता, तृप्ती कळली
स्मृतीचे नंदनवन फुलले!२

अभंग ज्ञानेश्वरी वाचता 
तो सत्कविवर प्रसाद देता 
मन हे गलबलले!३ 

समाधि मंदिर ते बोलविते 
अभ्यासाला शिस्त लावते
भक्तिपथावर पाउल पडले!४ 

नित्यपाठ हे संध्यावंदन 
अभंगगायन हे संजीवन 
सगळे समरसले!५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०६.०८.१९८९

श्रीस्वामी स्वरूपानंद जयजयकार करू!


श्रीस्वामी स्वरूपानंद जयजयकार करू! 
अंशत्वे अवनीवर आले श्रीगुरु करुणाकरु!ध्रु. 

दक्षिणेश्वरी रामकृष्ण जे 
अलंकापुरी ज्ञानदेव जे 
पावसेत पाहती साधका सोऽहं बोध करू!१

श्रीज्ञानेश्वरी तनिमनि मुरली 
अभंगरूपे बहरुनि आली 
ॐ रामकृष्णहरि जपता जपता मंगलस्नान करू!२ 

जगदंबेने खेळ दाविला 
मरणाचाही करुन सोहळा 
अमृतधारा अशा बरसल्या अमृतानुभव स्मरू!३ 

दृष्टीमध्ये ये वत्सलता 
स्पर्शनातही अतिकोमलता 
खोलीमधल्या खोलीमाजी आनंदे उतरू!४ 

नामसाधना करवुन घेती 
अभ्यासाचा ध्यास लावती 
परिस्थिती मग असो कशीही गाऱ्हाणे का करू?५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.०८.२००४

हुंदके येतात कंठी!

हुंदके येतात कंठी, अश्रु गाली वाहती 
प्रथम तू अन् मृत्युही मग गाठ तोडी शेवटी 
बावरे माझी मती! १

तू दिलासी जो जिव्हाळा 
तो न कोठे लाभला 
एकटा मी तुजविना रे सांगु हे कोणाप्रती? २

दैन्य व्याधी अन् उपेक्षा 
या विना कसली अपेक्षा 
या त्रिशूले विद्ध केली त्यागमूर्ते आकृती! ३

भांडलो अन् तंडलो 
हासलो हेलावलो 
हट्ट ही जपले उराशी विसरु कैसा या स्मृती! ४

हातचा कर काढता तू 
भग्न झाला भावसेतू 
तू तिथे अन् मी इथे ना दो ध्रुवांची संगती! ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(लोकमान्य टिळकांच्या चरित्रावर आधारित आगरकरांच्या निधनाच्या प्रसंगावरील काव्य)

Sunday, November 6, 2022

आम्ही नुरलो देहाचे

नाम घेता निरंतर देवाचे 
आम्ही नुरलो देहाचे!ध्रु. 

विसर पडला ऐहिकाचा 
नामे झाली शुद्ध वाचा 
प्रभुशी नाते प्रेमाचे!१ 

दृष्टी वळली आत आत 
मावळले मग दृश्यजात 
यात्रिक आम्ही सूक्ष्माचे!२

गुरुकृपेचे अंजन मिळता 
सरली सरली विकारवशता 
ऐसे साधक भाग्याचे!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

नको रे नको मना वासना!

 
नको रे नको मना वासना!ध्रु. 

विसर पाडते 
बहु नाचविते 
घालुनि धिंगाणा!१ 

राम मिळाला 
काम कशाला 
सोडि न प्रभुचरणा!२ 

नाम स्मरता 
येते शुचिता 
अन्य सुधा जगि ना!३ 

रचयिता श्रीराम बाळकृष्ण आठवले

हा देह साधन आहे


हा देह साधन आहे 
झिजण्यात मौज आहे 
भक्तीच योग आहे 
जो दक्ष साधताहे!१ 

अडला आधीच रडला 
थिजला मनात कुढला 
नरजन्म व्यर्थ गेला 
भूमीस भार झाला!२ 

कर्तव्य ओळखावे 
सानंद ते करावे 
कौशल्य ये सरावे 
योगी असे बनावे!३

सोपेपणा सुखाचा 
साधेपणा हिताचा 
ना बाऊ संगराचा 
सच्छिष्य माधवाचा!४ 

सानंद गात गीता 
गेला रमून पुरता 
तो आवडे अनंता 
रुचला स्वरूपनाथा!५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०६.०५.२००४

Sunday, October 30, 2022

असे हे रामायण आहे



असे हे रामायण आहे!ध्रु.
 
मर्यादा पुरुषोत्तम राघव 
रामनाम घे त्याला आळव 
देह अयोध्या - त्या नगरीचा 
राजा आत्मा आहे!१ 

वियोगातुनी काव्यनिर्मिती
इतिहासाची सजीव मूर्ती 
रामकथा गाता नि ऐकता 
समाधान फल आहे!२ 

संवादातlतुन निवेदनातुन 
स्वगतातुन ते मनामनातुन 
राजाराम जय सीताराम 
अमृतसंचय आहे!३ 

सत्यासाठी नीतीसाठी 
उतरायाची कठिण कसोटी 
सर्वस्वही ते पणा लावणे 
दाहक संजीवन हे!४ 

चला सुजन हो राम जागवू 
घराघरातुन तया आणवू 
बलसंवर्धन गुणसंवर्धन 
ध्येय खुणावत आहे!५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२३.०५.२००४

आनंद होइ कैसा? घ्‍यावा स्‍वत:च शोध

आनंद होइ कैसा? घ्‍यावा स्‍वत:च शोध 
मन स्‍वस्‍थ होय कैसे? लावी स्‍वत:च शोध! ध्रु. 

स्‍वानंद का रुचेना? 
इच्‍छा न टाकवेना
रामामनी असे जे होते तसेच बोध! १ 

अभिमान सोडताच 
होऊनि मुक्‍त नाच 
चिंता मुळीच सरली, उठणार नाही क्रोध! २  

नामी असे रमावे
रामेच की भुलावे 
जगि आत्‍मदान श्रेष्‍ठ हे जाणि तो सुबुद्ध! ३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २१४, १ ऑगस्‍ट वर आधारित काव्‍य)

दीनजनांची गुरुमाउली पावसेत वसली



दीनजनांची गुरुमाउली पावसेत वसली 
कृपामृताची करुणा तिचिया रूपे साकारली! ध्रु. 

ती शांतविते मनिची तळमळ 
मोदझरा वाहविते झुळझुळ 
शीतल गंधित वायुलहरिने तनु पुलकित झाली! १ 

दर्शन शुभकर मनास सुखकर
मनी जागवी श्रीशिवशंकर 
साद शिवाची हिचिया स्‍पर्शे जीवकानि आली! २ 

भगवद्भक्ती जनां शिकविते 
वळण प्रवाहा योग्‍य लाविते 
भागीरथि जणु हिचिया रूपे नगरातुनि वाहिली! ३ 

ओघवती तशि रसाळ वाणी
साहित्‍याच्‍या सुवर्णखाणी 
ही शब्‍दश्री ही अनुभवश्री आनंदे प्रकटली! ४ 

सोऽहं भावचि हा तनुधारी 
भक्‍तजनांचा हा कैवारी 
कलियुगातही अतर्क्‍य घटना पावसेत घडली! ५ 

निजस्‍वरूपी संतत रमणे 
तीच भक्ति ते ज्ञान जाणणे 
श्रीचरणांच्‍या अस्तित्‍वाची खूण इथे पटली! ६

संप्रदाय वाढला वाढला 
हा वेलू गगनावरि गेला 
ज्ञानमाउली स्‍वरूपरूपे पावसेस परतली! ७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
(पावसच्या स्वामी स्वरुपनंदांच्या चरित्रावर आधारित काव्य)

मातृभूला मी नमी


यौवनी या राष्‍ट्रकार्या वाहतो सर्वस्‍व मी!  
मातृभूला मी नमी! ध्रु. 

देश माता, देश गुरु हो, देशसेवा साधना 
देशभक्ती ईशभक्ती तीस दुसरा अर्थ ना 
कर्मयोगी कार्यकर्ता नम्र सेवक होत मी! १ 

लोकमान्‍यी देव दिसला मोहनांतरि मोहन 
हे महर्षी धन्‍यता ही सजल करिते लोचन 
भाव माझा थोर ठेवा जीवनांती जपिन मी! २ 

जे स्‍वदेशी तेच रुचते तेच देई चेतना 
जे विदेशी ते न रुचते वासनेसी वाव ना
देह लागो देशकार्यी प्रार्थितो देवास मी! ३ 

छात्र मजसी देव झाले बोध ऐसा द्यायचा 
रंगता त्‍यांच्‍या सवे दंग आत्‍मा व्‍हायचा 
ग्राम आश्रम होउ दे याचसाठी झटिन मी! ४ 

बाल्‍य माझे शोधताहे हासते जे भोवती 
दिव्‍य गंधा हुंगताहे अंतरी जो संप्रती 
सूर माझा सहज गवसे संगिती या धुंद मी! ५ 

शुद्ध हेतू यत्‍न सेतू पोचणे दुसऱ्या तिरी 
मीच मजला पुढति नेणे ठाउके मजला परी 
आत्‍मश्रद्धा सद्गुरुसी सर्वभावे प्रार्थि मी! ६ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
(पावसच्‍या स्‍वामी स्‍वरुपानंदांच्‍या चरित्रावर आधारित काव्‍य)

Wednesday, October 26, 2022

कधि होइन देहातीत? कधि दिसेल मज भगवंत?

कधि होइन देहातीत? कधि दिसेल मज भगवंत?ध्रु.

मी नच देही, मी नच देही
या देही होईन विदेही
कर्तेपण घालविण्या व्हावे लागे उत्तम भक्त!१

वृत्ती रामाकार बनावी
विषयाची आवड संपावी
आसक्तीतुनि करी मोकळा, करि मज विषयी विरक्त!२

उंबरठ्यावर दिवा ठेवला
उजेड लाभे दोन्हि बाजुला
अनुसंधानहि तैसे वाटे - उपजो भक्ती प्रीत!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २७१, २७ सप्टेंबर वर आधारित काव्य)

दीप उजळले! दीप उजळले!

दीप उजळले! दीप उजळले!!
दीपोत्सव हा अभिनव विश्व बहरले!ध्रु.

नाही जरि तेल मिळे
काय कुणाचे अडले
दीपपात्रि उदक जरी ज्योत ती जळे!१

लखलखले दीप सर्व
नष्टभ्रष्ट तिमिर गर्व
कुत्सित जे जन त्यांचे, नकळत कर जुळले!२

पाझरती लोचने
शरमिंदी खलवदने
द्वारका प्रकाशली, भक्तिकमल उमलले!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(श्री साईनाथ चरित्रातील एका प्रसंगावर आधारित काव्य)

Sunday, October 23, 2022

मनाचे श्लोक गात जा ..

ऑडिओ - मनाचे श्लोक गात जा

मनाचे श्लोक गात जा 
तुझा तू शिक्षक राजा! ध्रु.

मारुति श्वासाश्वासात 
अनंतचि हा राघवपंथ 
लाडक्या, गगनी जा जा!१ 

असे जो सोडविता देवा 
तोच तो राघव जोडावा 
तनाहुन दूर सरक जा!२ 

गीता असे मनोबोध 
समर्था आत आत शोध 
स्वधर्मा आचरीत जा!३ 

जगाचे काय किती घेणे 
निश्चये ऋण फेडत जाणे
काया कष्टवीत जा!४ 

सुखाच्या अधीन जो होतो 
नित्य तो खोल खोल रुततो 
कमळ तू फुलवत जा जा!५ 

नाम ते सुधारून घेते 
अधीरा सुधीर ते करते 
निष्ठा बळकट कर जा!६ 

राघव जीवनात आहे 
राघव स्थितप्रज्ञ आहे 
मनाने प्रसन्न हो जा!७ 

समर्थे समर्थ मन करणे 
असे हे गुणाधीश होणे 
तुझा तू स्वामी हो जा!८ 

जय जय रघुवीर समर्थ! 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२९.०८.२००४

Friday, October 21, 2022

जय जय विनोबा गीताई

(गायिका : माधुरी धर्माधिकारी)


जय जय विनोबा गीताई!ध्रु. 

भावे गीता वाचावी 
सोऽहं मुरली ऐकावी 
सोबत जीवनभर होई!१ 

देहाला जर खरचटले 
मन हे वेडे भरकटले 
कर जोडुनिया तू गाई!२
 
कर्तव्ये नच टाळावी
विघ्ने सगळी मायावी 
जनन मरण स्वाभाविक ही!३
 
माधव करतो प्रतिपाळ 
तोल आपला सांभाळ 
सद्बुद्धी कामा येई!४ 

विभूति चिंतन चालावे 
जगन्नाथमय जग व्हावे
शीक नि शिकवी गीताई!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६.०९.२००४

Wednesday, October 19, 2022

जय जय योगेश्वर भगवान् कर्तव्याच्या मार्गावरती कोण सान महान् !

जय जय योगेश्वर भगवान्
कर्तव्याच्या मार्गावरती कोण सान महान् !ध्रु.

असेन अथवा नसेन ही मी, तो परमेश्वर आहे 
कसे वागतो, कसे बोलतो याचा साक्षी आहे 
मानव मंगलतेची मूर्ती शिल्प घडविले छान!१
 
वेदांचा अभ्यास घडावा स्वाध्यायाचा छंद 
मुलेमुली वाढती घरोघर सगळी बालमुकुंद 
ध्येय असावे सुदूर प्राप्तीसाठी गावे गान!२

शरीर सुघटित भेदक दृष्टी वाणीही ओजस्वी 
हात आडवे छाती वरती मुद्रा अति तेजस्वी 
त्रिकाल संध्या गीतागायन म्हणजे अमृतपान!३ 

हात न पसरावा मागाया डबे संगती घ्यावे 
गोपाळाचे नाम घेउनी कामालाच भिडावे 
बंधुत्वाच्या सहकाराच्या भावा ना उपमान!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१०.०५.२००४

Tuesday, October 18, 2022

त्‍वमेव जननी भगवद्गीते, सुता वयं ते नमोऽस्तुते !

त्‍वमेव जननी भगवद्गीते, 
सुता वयं ते नमोऽस्तुते ! ध्रु. 

त्‍वं छायाऽसि तप्‍तानाम् 
त्‍वं हि जीवनं तृषितानाम् 
कृतार्था वयं सश्रद्धाश्च नमोऽस्तुते! नमोऽस्तुते!१ 

पयसि त्‍वं हि शक्तिदायिनी 
मनसि त्‍वं संतोषवर्धिनी 
शान्‍तिं पुष्टिं ददासि मातर् वारं वारं नमोऽस्तुते!२ 

रत्‍नानामाकरोऽसि त्‍वम् 
निर्भयमनसां धैर्यं त्‍वम् 
अमितगुणवति, स्‍फूर्तिदायिनी, नमोऽस्तुते! नमोऽस्तुते!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

सगळी तीर्थे तुझ्यांत वसती


सगळी तीर्थे तुझ्यांत वसती 
हो ना गं आई? 
माझे वंदन तव पायी! ध्रु. 

तुमची सेवा माझा मेवा 
सर्वसुखाचा अमोल ठेवा 
मायपित्‍याहुनि क्षेत्र पुण्‍यकर अवनीवर नाही! १ 

जुन्‍यांतुनी जे मिळते कांचन 
स्‍फूर्तिप्रद ते तेच चिरंतन
दिव्‍य वारसा आनंदाने मिरविन मी डोई! २ 

तीर्थोतीर्थी दादा हिंडत 
कस्‍तुरिमृगसम सुगंध शोधत 
त्रैलोक्‍याचे सुख साठवले सदनातच पा‍ही! ३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
(श्री गणेशदर्शन – लेखनकाल – १९७२)

Monday, October 17, 2022

मन तेरा है, तन तेरा है मैं जो कुछ भी हॅूं, तेरा हॅूं!

मन तेरा है, तन तेरा है 
मैं जो कुछ भी हॅूं, तेरा हॅूं!  
मैं तेरा हॅूं! मैं तेरा हॅूं! ध्रु. 

ऑंसू तेरे, हँसना तेरा 
जो भाव चित्त में, सब है तेरा 
मैं तेरा हॅूं! मैं तेरा हॅूं!१ 

धन तेरा है, सुख तेरा है 
करनी तेरी, फल तेरा है 
मैं तेरा हॅूं! मैं तेरा हॅूं!२ 

तू सुंदर है, मतवाला है 
तू दयाधर्म का दानी है – 
जो कुछ भी मिले मुझको तुझसे – 
मैं उसमें मोद मनाता हॅूं 
मैं तेरा हॅूं! मैं तेरा हॅूं!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
(शिर्डीच्‍या साईबाबांच्‍या चरित्रावर आधारित काव्‍य)

Sunday, October 16, 2022

अगा पुंडलीका

मातृपितृभक्ती शिकवी अगा पुंडलीका!ध्रु. 

देव भुलला सेवेला 
विटेवरी थांबवीला
तीच भक्ति देई सत्वर अगा पुंडलीका!१

पितृहृदय प्रेमा कळु दे 
मातृपितृचरणा चुरु दे 
कृतज्ञता प्रकटो नयनी, आसवेच गंगा!२ 

दिव्य तुझा सेवाभाव 
जिंकलास देवराव 
तूच देव तत्त्वाचरणे मजसि पुंडलीका!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.०३.१९७५

Thursday, October 13, 2022

झणि हो पार्था तू सावध रे

श्रीकृष्‍णांच्‍या बोलण्‍यातील उपरोधाची, क्रोधाची तीव्रता कमी झाली. सहानुभूतीचे मेघ अर्जुनाच्‍या अंत:करणातल्‍या वणव्‍यावर बरसू लागले. आताच्‍या त्‍यांच्‍या बोलण्‍यात अनौपचारिकता होती. 

अर्जुनाचा शोक कसा अनाठायी होता हे ते खुबीने दाखवू लागले. 
अरे नाश होतो म्‍हणतात तो देहाचा – परब्रह्माला नाश ही अवस्‍थाच ठाउक नाही.  माणूस शूर ठरतो त्‍याच्‍या सोशिकपणाच्‍या बळावर.
 
वक्‍तृत्‍वाचा तो गंगौघच होता. अर्जुनाच्‍या मनावरचा भार हलका होण्‍याला या बोलण्‍याची फार मदत झाली.

परस्‍परविरुद्ध विचारांच्‍या आवर्तात सापडलेल्‍या अर्जुनाचा तोल सावरायला भगवंतांनी दिलेला धीर उपकारक ठरला. 

भगवान् म्‍हणाले - 

धीर धरी, पुस अश्रुसरी, 
झणि हो पार्था तू सावध रे 
तुज खुळा म्‍हणू की पंडित रे? ध्रु. 

ज्‍याचा शोक न करणे कधिही 
त्‍यासाठी तू रडसि प्रत्‍यही 
पांडित्‍याच्‍या गप्‍पा करता 
वेडेपण दिसते जगास रे!१  

तूच सर्व का विश्‍व निर्मिले 
प्राण्‍यांतरि चैतन्‍य ओतले 
तू न मारले तरि का कोणी 
शाश्‍वत जगती राहिल रे!२  

बाल्‍यानंतर येते यौवन 
यौवनांतिही तसे वृद्धपण 
जन्‍ममृत्‍युचे चक्र सदोदित 
नियमित असते फिरते रे!३  

अशाश्वताचा शोक नको तुज 
सुखदु:खांचा केवळ भासच 
सहनशीलता निशिदिनि वाढव 
सोसण्‍यात नित गौरव रे!४  

इंद्रियवश जो मानव होई 
चैतन्‍याते विसरून जाई 
सुखदु:खांच्‍या गिरक्‍यांमाजी 
भोवळ चित्ता येते रे!५  

जे नाही ते असेल कैसे? 
जे आहे ते लोपे कैसे? 
तनु नश्वर ही शाश्वत आत्‍मा 
मर्म एवढे जाण बरे!६  

ज्‍यास जन्‍म ना, मृत्‍यु न त्‍याला 
आत्‍मा नच कधि घडला फुटला 
वस्‍त्रांतर करि मानव जैसा 
नवतनुशेला पांघर रे!७ 

जन्‍मा आल्‍या मरण ठाकते
मरण पावता जनन लाभते 
होणारे ते न चुके कधिही 
शोक न त्‍याचा करणे रे!८  

जन्‍मजात तू क्षत्रिय पार्था 
तुला न शोभत अशी भीरुता 
धर्मयुद्ध तर क्षत्रियास जणु 
दार खुले स्‍वर्गाचे रे!९  

रणी मरशि तर स्‍वर्गा जाशी 
विजयी होता मही भोगशी 
युद्धासाठी हो कृतनिश्‍चय 
झटकुन मोहा ऊठ त्‍वरे!१०  

विजय मिळो वा लाभो अपजय 
समान दोन्‍ही समज धनंजय 
द्वंद्वातीता युद्ध करी तुज – 
पाप न तिळभर लागत रे!११  

स्‍वधर्मदीपक घेउन हाती 
पुढे पुढे चालणे संप्रती 
अधर्मकंटक निखंदता- अपघाता 
तिळहि न वाव उरे!१२  

कशास ओझे शिरि वागविशी 
नसती चिंता कशास करसी? 
कर्तव्‍याचे धरुनि वल्‍हे 
जीवननौका वल्‍हव रे!१३   
    
रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

Wednesday, October 12, 2022

ह्या गीतेच्या सरितेतीरी सुरम्य कुटि बांधुनी रहावे

गीतेची पावन गंगा शतकानुशतके वाहत आहे.  तिच्या तीरावरती नवनव्या प्रमेयांची वने बहरली आहेत. प्रवाहावरून वाहत येणाऱ्या वाऱ्याच्या मंद झुळका अंगांगावर रोमांच फुलवीत आहेत.

कुठलाही श्लोक गुणगुणावा आणि जिभेवर विरघळणाऱ्या खडीसाखरेप्रमाणे त्याच्या अर्थाची गोडी मनात रेंगाळत राहू द्यावी.  डोळे सजल व्हावेत, कंठ दाटून यावा - मनाला समाधिसुखाचा अल्पांशानं का होईना अनुभव लाभावा.

गीता गाउली आहे, दीनांची माउली आहे, संसारतापानं पोळणाऱ्यांची सावली आहे हे जाणवत असताना मनात एकच स्वप्नपुष्प फुलू पहाते -
---------------------------------------

ह्या गीतेच्या सरितेतीरी सुरम्य कुटि बांधुनी रहावे
सांजसकाळी आचमनांनी गंगेसम मन निर्मळ व्हावे!

अवगाहन नित करता करता
विनम्रभावे समरस होता
सुदाम होउनि चित्तमुकुंदा मुठीमुठींनी पोहे द्यावे!१

अर्थसुगंधित पवन येउनी
रोमरोम तनि जात फुलवुनी
आनंदाश्रूंच्या धारांनी तदा चिंब मी भिजुनी जावे!२

अनंत रत्ने असंख्य मोती
विचारेच या डोळे दिपती
कृष्णभक्तिचे काजळ रेखुन नेत्रांचे पारणे फिटावे!३

कधी संभ्रमी धनंजयासम
ग्रासत असता विषण्णतातम
झोत प्रभेचा अवचित येता विहगासम गगनी विहरावे!४

मानसात मुरलीधर यावा
वेणुनाद श्रवणी साठावा
वत्सासम मी दुडुदुडु धावत गीताधेनूशीच झटावे!५

ज्ञानकर्मभक्तीच्या त्रिदला
वाहुनिया श्रीहरिपदकमला
मीरेसम सर्वस्व समर्पुन माधवात त्या मी मिसळावे!६

गीत-गीता
कवि - श्रीराम आठवले

अमर अमर ती गीतावाणी

गीता - भगवंतांनी गाइलेली सुमधुर गीता! अमृतमय गीता! स्फूर्तिदायिनी गीता! पुरुषार्थबोधिनी गीता! अवघे ७०० श्लोक पण संजीवनीने भरलेले - भाविकांना पुरतेपणी भारून टाकणारे.

अशी ही गीता आपल्या सगळ्यांचीच माता, वात्सल्याचा सागर, विचारांचा रत्नाकर. तिच्या चिंतनाने मनाला स्नान घडते विवेकाचे पोषण घडते अशी सुसंस्कार घडवणारी गीता, संत ज्ञानेश्वरांनी मराठीत आणली - 'इये मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ' केला.
गीता आणखी सोपी केली आचार्य विनोबांनी! तीच गीता छोट्या छोट्या गीतांतून आणता आली तर - गाताही आली तर..

श्रोतेहो - आपण संतांनी मला पावन करून घ्यावे, सुरात सूर मिसळून द्यावा - अमृतसागर उचंबळावा हीच प्रार्थना! हीच चरणी विनवणी!

-------------------------------------
मधुरागांनी मंजुस्वरांनी
गाऊ पूजू कल्पसुमांनी
अमर अमर ती गीतावाणी!ध्रु. 

अनंत आत्मा काया भंगुर
देहभावना विसरुनि सत्वर
प्रभू तोषवू कर्मफुलांनी!१

काय करावे जधी कळेना
विकल्प उठती मनात नाना
सहाय्य गीता होत तत्क्षणी!२

लोकसंग्रहा देत प्रेरणा
अंगांगी निर्मिते चेतना
तत्पर ठेवी तत्त्वपालनी!३

तोल मनाचा नित सांभाळी
सदा कृपेची पाखर घाली
वात्सल्याचा सागर जननी!४

युगे लोटली उभी तरीही
ज्ञानदीप तो तेवत राही
तीच सुकाणू नौकानयनी!५

अमर अमर ती गीतावाणी!
गीत गीता
कवि : श्रीराम आठवले

Sunday, October 9, 2022

गीता गाता येते



गीता गाता येते गाता गाता कळते!ध्रु.

जीवन ही रणभूमी आहे येथे लढणे अटळच आहे 
प्रहार करणे तसे झेलणे हरिस्मरण तर श्वसनच आहे 
जे जे कळले, वळते!१ 

सरळ मनाचा अर्जुन व्हावे, कृष्णाला सारथी करावे 
असा सद्गुरु नाही दुसरा तने मने श्रीहरिचा व्हावे 
सत्कृति पूजन घडते!२ 

पाचही प्राणांचा या पावा, आपआपला श्रवण करावा 
नित जावे प्रेमाच्या गावा, का बाळगणे कुणी दुरावा 
साक्षीपण हितकर ते!३ 

गीताभ्यासी ये ओळखता कसा हासरा कसा खेळता 
सुमन मनाचे बघता बघता हरिचरणी राहणे योग्यता 
अतूट असते नाते!४ 

खचायचे ना कधी मनाने, झेपावे गगनी विहगाने 
तन हो बळकट व्यायामाने नरनारायण सोऽहंध्याने 
कृष्ण, कृष्ण म्हण नुसते!५
 
कर्मफलाची आशा नाही सुखदुःखांचा स्पर्शच नाही 
गुणातीत हा होऊन जाई असून जगती जगात नाही 
कोडे अलगद सुटते!६ 

अवघ्या आशा श्रीकृष्णार्पण श्रीहरि कर्ता समजुन उमजुन 
हलके फुलके झाले तनमन, श्रीगीतेचे हे पारायण
फला सुफलता मिळते!७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०५.०५.२००४

केडगावची अतिशय प्रेमळ नारायण माउली

केडगावची अतिशय प्रेमळ नारायण माउली 
पुन्हा पुन्हा या बेटावरती स्मितवदने वदली! ध्रु.
 
श्रीनारायण जय नारायण दत्त दत्त बोला 
आत्म्यावर विश्वास ठेवुनी आनंदे डोला 
वेदनेवरी आपण होउन फुंकर ती घाली!१ 

संध्यावंदन समय न चुकवा परमलाभ होई 
गायत्रीच्या मंत्रोच्चारे मळ धुतला जाई
दारे खिडक्या प्रभातसमयी ठेवा पूर्ण खुली!२ 

का बाऊ करणे दुखण्याचा दत्तनाम घ्यावे 
थोडे थोडे भस्म घेउनी देहा लावावे
खडीसाखर या रसनेवरती अलगद विरघळली!३ 

अनुग्रहच नारायणगुरुचा कर फिरला देही 
मन हो सुस्थिर भक्ता केले जसे वज्रदेही 
शिकवा बाळा रोग पिटाळा आठवल्या ओळी!४ 

सत्यच नारायण पटण्याला सामूहिक पूजने 
समरसता साधाया पोषक अन्नदान घडणे 
धर्म सनातन रक्षणकर्ता नाडी ओळखली!५ 

रसिकांचा राजाच जसा हा दीनांचा बंधू 
कुशल संघटक हेच बिंबवी तुम्ही आम्ही हिंदू 
छुपे आक्रमण धर्मावरचे थोपवी त्या वेळी!६ 

सत्य न मरते अपप्रचारे अंतर्मन साक्ष
कर्तव्याच्या पालनात प्रत्येक असो दक्ष
परानुकरणाची दृढ बेडी क्षणार्धात तुटली!७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६ ऑक्टोबर २००३

Wednesday, October 5, 2022

प्रतिप्रश्नाला असते उत्तर वाचत जा गीता चिंतन करता निशिदिनि त्याचे सरताती चिंता!



प्रतिप्रश्नाला असते उत्तर वाचत जा गीता 
चिंतन करता निशिदिनि त्याचे सरताती चिंता!ध्रु.

कोण असे मी? "तो मी तो मी" मनास बजवावे 
श्वासाला ते नाम जोडुनी आपण ऐकावे 
माधव बोले नित अपणाशी अभ्यासा बसता!१ 

काय करू मी? प्रश्न व्यर्थ हा, कार्य काय ठरले
निर्वाहा जे साधन आले, उपासना ठरले 
पूजन ते तर भगवंताचे सद्भावे घडता!२
 
मन का कष्टी? नावड का ती अपुल्या कामात 
देहबुद्धि ती भूलवू पाही घे घे ध्यानात
मनास अपुल्या करुनि मोकळे देवाशी वदता!३

मी का रोगी? व्यथा-यातना का मम देहाला? 
काय नि कितिदा कैसे खाशी विचार अपणाला 
तुझा तूच आजारा कारण निदान हे कळता!४ 

जे नच जवळी तेच हवेसे का ऐसे वाटे? 
जे मजपाशी असे सदाचे का न कळो येते? 
मना वळव रे आत साधका त्वरा करी आता!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२९.०९.१९८९

Tuesday, October 4, 2022

जय जय तुलसीदास

जय जय तुलसीदास, 
करा हो भक्ताचे घरि वास!ध्रु. 

तुलसी, तुलसी मानस गाते 
जय सियाराम कुणि कानी म्हणते 
ये तुलसीचा वास!१ 

श्रीरामाची सुभग आकृती 
उभी राहते नयनांपुढती 
मन भिडले गगनास!२ 

गगन निळे श्रीरामच आहे 
मन पवनाचा पुत्रच आहे 
रामदूत जणु खास!३ 

मानसात मन करि अवगाहन
श्रीरामाचे मिळे निमंत्रण 
भेटे जीव शिवास!४ 

काम मनीचा राम करा हो 
पंकातुन पंकज फुलवा हो 
रामच तुलसीदास!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६.०७.१९८४

Sunday, October 2, 2022

महात्मा गांधी हा जप करा आतल्या रामाचा कर धरा!

महात्मा गांधी हा जप करा 
आतल्या रामाचा कर धरा!ध्रु. 

भाषा ही शब्दांची नसते 
भाषा तर हृदयाची असते 
श्रद्धा श्वासच अपुला करा!१ 

या सत्याच्या मार्गावरती 
निखारेच जणु फुलले असती 
तरीही सत्याग्रह तुम्ही करा!२ 

विवेक ज्या त्या हृदयी असतो 
खचितच जागा करता येतो 
आसरा हिंसेचा नच धरा!३

जग हे जगते प्रेमाखातर 
जग हे मरते प्रेमाखातर 
सुजनहो विचार यावर करा!४

साधे जगणे उच्च विचार 
विचार तैसा हो आचार 
पारख अपुली आपण करा!५
 
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.०६.२००१

Monday, September 26, 2022

प्रभातकाली सोऽहं भावे भूपाळी आळवू! स्वरूपनाथा सद्गुरुनाथा हृन्मंदिरि बसवू!

प्रभातकाली सोऽहं भावे भूपाळी आळवू!
स्वरूपनाथा सद्गुरुनाथा हृन्मंदिरि बसवू!! ध्रु.

शांत सुशीतल वातावरणी तनु पुलकित झाली
स्वामी अपुली मूर्ति आगळी हसतमुखे आली
कर जोडुनिया मस्तक अमुचे पदकमली ठेवू!१

भारतीय मी, देश देव हा भाव पुरा जागला
जातिधर्मभाषांचा भेदहि लोपुनिया गेला
नाथपंथिची ध्वजा स्वामिजी नभि डोलत ठेवू !२

अभंगातुनी ओवी प्रकटे सोपी ज्ञानेश्वरी
साधकासही ध्याना बसवी माता योगेश्वरी
अमृतधारा वाचुनि नाचत मरणभया पळवू !३

पावस हे घर, घरात पावस स्मरणी आवेग 
घन जलधारा बरसत आला श्रावणीय मेघ
नित्यपाठ नेमाने म्हणता पद पुढती ठेवू !४ 

अलकापुरिच्या ज्ञानेशा हे पावसच्या नाथा
अलौकिका घ्या प्रणाम कोटी झुकलासे माथा
एक हृदय हो भारतजननी भाव मधुर जागवू !५ 

स्वामी माझे, मी स्वामींचा संजीवनि गाथा 
आळविताना अभंग त्यातिल कंपित तनु आता
चिरंजीविता कृतीत वचनी  सकलांना दावू !६

स्तवन करावे शब्द न पुरती मन हे मौनावे
दर्शनास हे नयन न पुरती ते मिटुनी घ्यावे
श्रीरामासह बंधु नि भगिनी भावफुले वाहू !७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, September 25, 2022

गीता संध्या


आहारावर पूर्ण नियंत्रण 
जीभ असावी ताब्यात 
विहारही मोजका असावा 
वीर न बुडतो विषयात
वीर न बुडतो विषयात!१ 

भलेबुरे ते आतुन कळते 
विवेक प्रामाणिक मित्र 
मने मनाला जोडत जावी 
संघटनेचा हा मंत्र 
संघटनेचा हा मंत्र!२ 

नकोच आसक्ती कसलीही 
देहाची वा स्वजनांची 
अप्रिय जरी कर्तव्य भासले 
सबब नको टाळायाची 
सबब नको टाळायाची!३ 

संध्यासमयी घ्या आढावा 
स्वभाव कैसा, कसा हवा
श्रीकृष्णाच्या नामस्मरणी 
उद्या उजाडो दिवस नवा 
उद्या उजाडो दिवस नवा!४ 

असो नसो मी काय तयाचे 
महत्त्व ना या गोष्टीला 
मी कर्ता हा गर्व ना शिवो 
श्रीहरि दे भक्ती अमला 
श्रीहरि दे भक्ती अमला!५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.०७.२००३

गीताप्रभात


सर्वकाळ मज आठव पार्थ 
तुझी लढाई तू लढणे 
प्रामाणिक जो निजहृदयाशी 
कधी न त्याला पडे उणे!१ 
कधी न त्याला पडे उणे 

मरणाला भ्यायचे कशाला? 
अरे जन्मला तो मेला 
का डरतोसी  आघातांना 
जो हसला तो वीर भला!२ 
जो हसला तो वीर भला 

मी अपुले कर्तव्य पाळले 
यामध्ये जो संतोष 
सांग अर्जुना सख्या मला तू 
अपयश का असतो तो दोष?३
अपयश का असतो दोष? 

हारजीत जो समान समजत 
तोल मनाचा सांभाळी 
खेद न त्याच्या चित्ता स्पर्शत 
त्याच्या वदनी दिपवाळी!४ 
त्याच्या वदनी दिपवाळी 

गीता घ्यावी जगावयाला 
हरिनामाचा कर गजर 
जीवनयोद्धा तूच पांडवा 
लढताना तू मला स्मर!५ 
लढताना तू मला स्मर 

रचयिता :  श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.०७.२००३

भावार्थासह गीता समजो स्वामी स्वरूपनाथा


भावार्थासह गीता समजो स्वामी स्वरूपनाथा
अपुल्या चरणी टेकवीत मी हात जोडुनी माथा!१
साकी मजला बहु आवडली अंतरात ती ठसली
श्रीकृष्णाची कानी आली आतुन गीतामुरली!२
कळेल गीता गाता गाता ऐसा हा विश्वास
जे जे कळते ते ते वळते गुरुकृपेने खास !३
अर्जुन झालो जर मी स्वामी माधव आपण माझे
गुरुशिष्यांच्या संवादा या नित्य नवेपण ताजे!४
प्रातःकाळी नित्य म्हणावी भावार्थासह गीता 
उदात्त उन्नत होवो मानस गाताना श्रीगीता!५
अभ्यासाची मना माझिया ओढ अशी लागावी
अक्षर अक्षर पुरे ठसू दे आस हीच पुरवावी!६
मनात येता पावसला मी ऐसा अनुभव यावा
कृपाहस्त पाठीवर माझ्या स्वामी नित्य फिरावा!७
परिस्थितीशी जुळवुन घेणे मजला सहज जमावे
सदा हासरे जगास स्वामी माझे वदन दिसावे!८
लेखन अपुले मना लाविते अभ्यासाचा छंद 
डोळे मिटता मला जाणवे झालो मी गोविंद!९
प्रभातकाली मला उठविता धरुनि माझा हात
लिहू लाग तू बाळा वदता स्वामी स्वरूपनाथ!१०
रुक्ष वाटतो, वर्तनात मम ओलावाही यावा
विषयांचा तो लाग सुटावा कृष्णयोग साधावा!११
रामकृष्णहरि वदो वैखरी संजीवन दे मंत्र
गीता आचारात यायचे मला जमू दे तंत्र!१२
देहामधले विकार कौरव गाजवती अधिकार
विचार पांडव स्वराज्य इच्छिति कृष्णाचा आधार!१३
मी नच कर्ता, न लगे फल मज अंतरात बाणावे
स्वकर्मसुमने हरिपदी वाहुन कृतार्थ होता यावे!१४
अवघड नाही जगात काही, भेसुर नाही काही
इथेतिथे श्रीहरि कोंदला रिता ठाव मुळी नाही!१५
चलता चलता वाट संपते विश्रांतिस्थल येई
हळूहळू ये कर्मि कुशलता सुस्थिर मानस होई!१६
प्रयाणकालाची का चिंता अवघे हरिमय होते
सरे अहंता विश्वात्मकता तदा साधका वरते!१७ 
भलेबुरे वा जे जे घडते तुझिया आयुष्यात 
हरिची इच्छा असे मान तू बुडू नको मोहात!१८
जसा वागशी इतरांशी तू तसे वागती इतर
प्रेम लाभते प्रेमळ मनुजा पडो न याचा विसर!१९
एकांतामधि बसुनि घ्यावी आपआपली भेट
वाट अशी ही मुक्कामाला पथिका  नेई थेट!२०
चुकले नाही कर्म कुणाला का कंटाळा त्याचा 
ज्ञानासाठी आश्रय लागे घ्यावा कर्तव्याचा!२१
श्रीकृष्णाचे जीवन कैसे सांगे भगवद्गीता
मार्गदीप हा उपकारक हो जीवनयात्री करिता!२२
देव व्हायचे दानव किंवा ठरव तुझे तू आधी
दैवी संपद् थांग तिचा ना कुणास लागे आधी!२३
चुकता चुकता शिकता येते शिकेन मी हे बोल 
हृदयनिवासी सद्गुरु आतुन सावरती तव तोल!२४
आशावादी सदा असावे यत्न देव तो मान 
कर्म घडे जे कृष्णाज्ञेने यज्ञरूप ते जाण!२५
जे जे घडते ते कृष्णार्पण म्हणता देही मुक्ती
नाम स्मरता अंतःकरणी भक्तीला ये भरती!२६
जे जे भाविक  तया जनांना गीता सांगत जावे
आनंदाच्या प्रकाशात या आनंदाने गावे!२७
मनोबोध तो गीता आहे हरिपाठातही गीता 
तुकयाच्या त्या अभंगातही ऐकू येई गीता!२८
शिवथरघळ तर तुझ्या मानसी तूच शिष्य कल्याण
रामदास ते गीतागायक श्रोता तूच सुजाण!२९
जो सावध तो त्यावर ना ये पस्ताव्याची पाळी 
करू नये त्या कर्मालाही सहजपणाने टाळी!३०
तूच तुझा उद्धार करी हा श्रीगीतेचा घोष 
खचू न देई मना कधीही सदा मान संतोष!३१
देहामध्ये देव पहावा राखावा तो तुष्ट 
साह्य कराया धावत जावे दुजाभाव हो नष्ट!३२
एकटेपणा वृद्धा छळतो थोडी सोबत द्यावी
मधुर भाषणे, मधुर गायने आशा ती पुरवावी!३३
कसे वागशी तू इतरांशी गीतादर्शन त्यात
भलेपणाने जगी वागता सोऽहं आचारात!३४
देह येतसे देह जातसे खूणगाठ बांधावी
आत्मतत्त्व ते ध्यानी घेउन दुःखे ही सोसावी!३५
सुधारण्याला प्रत्येकाला जगात लाभे संधी
यज्ञचक्र जो चालू ठेवी समाज त्याला वंदी!३६
श्रवण करावे मनन करावे नाम स्मरता स्मरता 
जीवनात ये सहजच गीता गीता सर्वांकरिता!३७
ओंकाराच्या उच्चाराने  शांत शांत मन होते
मन पवनाला जाउन मिळते भजनानंदी रमते!३८
नित्य वाचनी गीता ज्याच्या ओठावरती नाम
सोऽहं मुरली त्याच्या कानी जी वाजवितो श्याम!३९
मुरवावा जर बोध अंतरी गीतामृत सेवावे
या गीतेच्या सरितेतीरी सांजसकाळी यावे!४०
आनंदाचे स्वरूप म्हणजे स्वरूप हा आनंद
ज्ञानी कर्मी योगी आहे भरला परमानंद!४१
देहाच्याही पलीकडे जो पहावायला शिकला 
त्या भक्ताला त्या ज्ञान्याला निराकार आकळला!४२
तत्त्वापासून ढळू नको रे गीतेचा संदेश
या देही या जन्मी मुक्ती देत तुला परमेश!४३
क्षण जो गेला वाया गेला तो न पुन्हा ये हाती
हे जाणुनिया ज्ञानी सज्जन अनुसंधानी असती!४४
इथली नाती मायावी ती खरा सोयरा राम
हे जाणुनिया अलिप्त राहुन शोधी आत्माराम!४५
परिस्थिती ही प्रश्नपत्रिका भगवंताने दिधली
सावधतेने चातुर्याने पाहिजेच सोडविली!४६
खचू न द्यावे धैर्य कधीही उत्साहाने जगणे
ओघे आले कर्म करावे नको नको डगमगणे!४७
केव्हाही तू श्रीगीतेचा श्लोक चिंतना घेई
पुनर्जन्म मानवा तेधवा नि:संशय तव होई!४८
तुझ्या रथाचे सूत्र मानवा कृष्णाहाती दे रे
करुनि अकर्ता कसे व्हायचे झणी शिकूनी घे रे!४९
जे कळते ते जना सांगता स्वभाव बदलत जातो
शोकाकुल तो आत्मज्ञाने वीरधीर तो होतो!५०
हो मृत्युंजय हो शत्रुंजय धनंजया तू आता
असे जाणवो जनांस कळते गीता गाता गाता!५१
सदा हासरा सदा खेळकर त्याला गीता कळली
अंतर्मुख तो लुटे आत्मसुख ऐके सोऽहं मुरली!५२
जो मज भजतो जैशा भावे तयास तैसा प्राप्त
हे आश्वासन माझे आहे भक्ताचा मी आप्त!५३
कृपा आपली स्वामी मजवर मला आपुले म्हटले
अश्रुजलाने श्रीरामाने चरण आपुले धुतले!५४
स्वरूप बोधावरी राहशिल द्यावा आशीर्वाद 
आणिक दुसरे न लगे मजला हा सद्गुरुप्रसाद!५५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, September 22, 2022

देव पहा माणसात


नको जाऊ देवळात- 
देव पहा माणसात!ध्रु. 

मुखे शब्द गोड यावा 
गोड शब्द हा विसावा 
देव आहे रे प्रेमात!१ 

मने सांभाळ, सांभाळ 
मग संतुष्ट गोपाळ 
देव मधुर बोलात!२

सर्व रूपे देवाची ती 
ऐसे आणूनीया चित्ती 
दिसो कोणी जोडी हात!३
 
मन ठेवावे प्रसन्न 
घरा येतो नारायण 
संत सारे सांगतात!४ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.०७.१९८९

श्रीनवनाथ जय नवनाथ

प्रभात होण्याआधी मजला नवनाथांनी जागवले
वीररसाची जोड भक्तिला दे दे आधी सांगितले!ध्रु. 

डरायचे या जगात नाही, गजाननाला नमन करी 
सूत्रे ध्यानी ठेव साजरी, ॐ  तत् सत् दे ललकारी
शिव शिव म्हणता आदिनाथ गुरु डमरूनाद करत आले!१

श्री गुरुदेवा दत्तात्रेया अनसूयासुत हसलात
काळोख्या रात्रीतुन झाली ज्योत्स्नेची जणु बरसात
उमेद वाढव नित जनतेची लेखणीने झरझर लिहिले!२ 

गूढ असे या जगात नसते उणीव डोळस पठणाची
चिकाटीस धर, धावे स्फूर्ती खूणगाठ वक्तृत्वाची
झपझप चालावे, न अडावे, माय धरित्री हे वदले!३ 

हाव हावरी करते फरफट, काळा पैसा यमपाश
भल्या गृहस्था परिवारासह गाडे विघ्नांची रास 
मोहाचा कर होम माणसा कृष्णमेघ जणु गडगडले!४
 
भले बुरे ते प्रत्येकाला आतुन कळते विवेक तो 
विचार त्याचा भाऊ, भक्ति ही बहीण संबंधच असतो 
बलोपासना सतेज करते, आदित्यही हासत बोले!५ 

निष्ठा सांगे निसटायाचे कसलाही हव्यास नसो 
सदाशिवाला, उमापतीला निर्मळ सुंदर स्थान असो 
पोथीमधल्या घटनांची ही संगत हलके सांगितले!६ 

श्रीनवनाथ जय नवनाथ शब्द खुणेचे यावेळी 
येता जाता घरच्या देवा वंदन कर जाणीव दिली 
आत्म्यावर विश्वास बालका ठेव पडो हे स्मरण दिले!७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, September 20, 2022

मी दास तुझा


मी दास तुझा, दास तुझा 
दास तुझा श्रीरामा! 
मम हृदयी ये, हृदयी ये 
हृदयी ये श्रीरामा!ध्रु. 

तू सदैव जवळी राही 
मी स्‍मरता दर्शन देई 
रे नामच तू, नामच तू 
नामच तू श्रीरामा!१  

घे करवुनि काही सेवा 
ती संधिच मजला मेवा 
नच आस दुजी, आस दुजी 
आस दुजी श्रीरामा!२  

घे खोल अंतरी ठाव 
हृदयी ये होउनि भाव 
तू प्रेम झरा, प्रेम झरा 
प्रेमझरा श्रीरामा!३  

मन नामी रमव रमव रे 
चरणी ते जडव जडव रे 
मी प्रार्थितसे, प्रार्थितसे 
प्रार्थितसे श्रीरामा!४  

तव चरित्र गाउन घेई 
सगुणातुन निर्गुणि नेई 
कर निर्मळ रे, निर्मळ रे 
निर्मळ रे श्रीरामा!५  

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
( समर्थ रामदास स्‍वामींच्‍या चरित्रावर आधारित काव्‍य)

Sunday, September 18, 2022

गोविंदकाका उपळेकर हो ऽऽ ओढ कशी लागली

गोविंदकाका उपळेकर हो ऽऽ
ओढ कशी लागली 
ब्रह्मच केवळ फलटणचे हे 
हसे ज्ञानमाउली!ध्रु. 

आहे- असु दे, नाही नसु दे 
भेद त्यात काय? 
हरिपाठाची पुरे शिदोरी 
पुरवुन ती खाय 
सदा हसावे, डुलत चलावे 
चिंतनात मुरली!१ 

हरि हरि म्हणता आनंद वाटे 
काटे बोथटती
कडु घोट परि सुखद गिळाया 
किमया गुरु करती 
उन्मनीत काका नित भेटा 
भूक तीव्र लागली!२ 

नयन मिटावे, आत पहावे 
हरिबाबा आत 
हात धरूनि ते खेचुन घेती 
गात्रे निवतात 
संगति लागे विसंगतीतुन 
कृष्णकृपा झाली!३ 

सुबोधिनीचे लेखन अपुले 
एक चमत्कार 
आघातांनी सुखद वेदना 
मन ब्रह्माकार 
मीपण लोपे, पाप विलोपे 
हरिमय योगबळे!४ 

अता न मागे फिरावयाचे भक्तिपथावरती 
कृष्णदेव गोविंदा मिळता 
फिटे भवभ्रांती 
माया तोडी पुसे सावली 
काका हे कळले!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०९.१९९७
भाद्रपद कृ ८

श्रीकृष्ण गोविन्द गाते चलो हसाते, रिझाते, लुभाते चलो। ध्रु


श्रीकृष्ण गोविन्द गाते चलो
हसाते, रिझाते, लुभाते चलो। ध्रु

हमें चाहिए, हम करें वन्दना
हमें चाहिए, हम त्यजे कामना
इसी जन्म में मुक्ति पाने चलो।१

जहां हम चलेंगे वहां कृष्ण है
जहां हम बसेंगे वहां कृष्ण है
सखा श्याम अन्दर छिपाते चलो।२

सदाचार ही धर्म कहते हैं श्याम
दुराचार ही पाप कहते हैं श्याम
सदा धर्म का पक्ष लेते चलो।३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, September 17, 2022

प्रभाती दिसली मंगलमूर्ती.



ॐ गं गणपतये नम:

प्रभाती दिसली मंगलमूर्ती! ध्रु. 

डोळे मिटले, ध्‍यान लागले 
तनामनाचे भान हरपले 
निवासा आली जणु शांती!१  

मनास शुण्‍डेपरि वळवावे 
आत्‍मरूप ते चिंतित जावे 
हळुहळू शिकवित मज ‘गणपती’!२  

तत्‍परतेने श्रवण करावे 
प्रसन्नमुख सर्वदा असावे 
ज्ञानिया शिवे कुठुन भ्रांती?३  

त्रिशूल करिचा अरि माराया 
मोदक करिचा मोद द्यावया 
बसावे ध्‍याना एकांती!४  

तनु मी नाही, मनही नाही 
सोऽहं आत्‍मा जाणिव होई 
सिद्धि ही दे मंगलमूर्ती!५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
२५.१०.१९८९

Thursday, September 15, 2022

योग्यता देशील ना?

ऑडिओ - योग्यता देशील ना
 
तू क्षमा करशील ना? 
तू दया करशील ना?ध्रु. 

अज्ञ मी मज ज्ञान नाही 
भक्ति करण्या भाव नाही 
योग्यता देशील ना?१

सुमन मी कोठून आणू? 
शब्द स्तवना कुठुनि आणू? 
जवळ परि घेशील ना?२ 

ओळखाया दृष्टि नाही 
साधनीही स्नेह नाही 
संगती असशील ना?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०१.११.१९७७

एकनाथ एक नाथ भागवती तेच ते!

एकनाथ एक नाथ भागवती तेच ते!
हरिचरणां स्मरुनि मना बिलग बिलग तेथे!ध्रु. 

भजने नर नारायण संत सांगतात
एक नाथ अंतरिचा जनी पाहतात
कृष्णरूप विश्व सर्व सज्जनास वाटते!१

कृष्ण कृष्ण आळवीत चिंतनी बुडावे
कार्य काय ध्येय काय आतुनि सुचावे
नाथ माय नाथ बाप भावभेट होते!२

जो पदार्थ क:पदार्थ सुख न त्यात काही
जो अनंत अंतरात त्यास तूच पाही
काम तुझा राम बनो श्याम येत तेथे!३

सद्गुण कर आत्मसात तूच देव होशी 
सोडुनि घर श्रीहरिला कुठे शोधतोसी?
तू प्रसन्न जग प्रसन्न हसत खेळ नेटे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०५.०५.१९८५

Wednesday, September 14, 2022

तू गीता मन में पढ ले तू गीता जन में गा ले



तू गीता मन में पढ ले
तू गीता जन में गा ले
तू मुक्‍त वायुमंडल में
छिन सुखद सॉंस तो ले ले । १

जो योगी है संन्‍यासी
मन में ना कभी उदासी
स्मितवदन तथा मितभाषी
यह बात ध्‍यान में ले ले । २

उत्‍कर्ष हाथ में होता
अपकर्ष हाथ में होता
अरि मित्र स्‍वयं ही बनता
दक्षताही तू अपना ले । ३

सुखदुख है आते जाते
हरिदास भजन ही करते
आसन से लेश न हिलते
आनंद ध्‍यान का ले ले । ४

मन जिस के वश में आया
वह श्रीहरि का मनभाया
बिंदु में ही सिंधु समाया
भावार्थ समझ में ले ले । ५

खोया है उसने पाया
सुख यहॉं साप की छाया
साधन है नश्‍वर काया
मोहन को तू अपना ले । ६

द्वंद्वो को सहनेवाला
दुख में भी हसनेवाला
बन ऐसाही मतवाला
अनुभूति आप ही ले ले । ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

तू गीता मन में पढ ले
तू गीता जन में गा ले 
तू मुक्‍त वायुमंडल में 
छिन सुखद सॉंस तो ले ले । १  

कर्म करना हर किसी को 
विवश है यहॉं हर कोई 
बुद्धि से यदि देख ले तो 
ज्ञानसाधन कर्म ही । २ 

मन से वश कर इंद्रियों को 
छोड दे तू मैं मेरा 
कर्म जनहित के लिए जो 
यज्ञ है सुंदर तेरा । ३ 

भावना सहकार की है 
स्‍नेह की नवनिर्मिति 
आयु उस की सफल है 
जो सन्‍मती है सुकृती । ४  

प्रकृति है सब कराती 
हॅू मैं कर्ता भ्रांति है 
चित्‍त रखता ईश में जो 
मुक्‍त है, विभ्रांत है । ५ 

आस, ममता त्‍याग कर 
तू कर्म हाथों से करे 
दुख क्‍या है, डर भी क्‍या है 
शांति से संग्राम करें । ६ 

काम जो है, क्रोध जो है 
ज्ञान को वे ही मिटाते 
इंद्रियोंका दमन करते 
वीरवर है विजय पाते । ७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

तू गीता मन में पढ लें 
तू गीता मन में गा ले 
तू मुक्‍त वायुमंडल में 
छिन सुखद सॉंस तो ले ले । १ 

शरचाप गिर पडें भूपर 
वह रोया मुँह को ढककर 
मैं नही लडूँगा कृष्‍ण 
क्‍यों पाप लूँ मेरे सिरपर । २ 

जो शरण में आया अपनी 
हो कितना भी अज्ञानी 
ईशने सीख दे नामी 
कर दिया है उस को ज्ञानी । ३ 

इस तन की कौन बडाई 
आत्‍मा की है परछाई 
कर्तव्‍य ही करना होगा 
तू जन को उत्‍तरदायी । ४ 

प्रज्ञा को स्थिर है रखना 
कभी अस्थिर ना हो देना 
सुखदुख को समही समझ तू 
बस मन को सुमन बनाना । ५   

शांति अक्षय धन है 
लडना यहॉं अटल है 
निर्वैर हो पहले पार्थ 
युद्धही तपश्‍चर्या है । ६ 

श्रीव्‍यास अतुल पंडित है 
संवाद तो रोचक ही है 
जी जान से कोई पढ ले 
संतोष मधुरतम फल है । ७   

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

तू गीता मन में पढ ले
तू गीता जन में गा ले
तू खुली हवा में प्यारे
जरा मुफ्त सॉंस तो लेले।१

ना समझ पार्थ ने पहले 
एक कदम तो गलत उठाया
श्रीकृष्ण सारथी ने तो 
गलती को सुधर दिया।२

ये काम क्रोध तो दैत्य - 
मायावी कपटी हैं ही
भूल का समर्थन करना
है पातक मेरे राही। ३

अपना है कौन पराया
कुछ भी न समझ में आया
श्रीहरिजी कुछ भी न बोले
मौन से मित्र फिर जिता।४

अँधेरा छाया लगता
ये चोटभी गहरी पहुँची
ये बुँद बुँद आसू की
दीक्षा दे सोच समझ की।५ 

श्रीकृष्ण कृष्ण गर गाता
तू हरि को जागृत करता
तो कभी न प्यारे तुझको 
पछताना योंही पडता।६ 

इस विषाद ने सत्कार्य
इतना तो जरूर किया है
शिष्य को लाभ सद्गुरु का
अद्भुत ये हरि लीला है, अद्भुत ये हरि लीला है। ७


रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले


तू गीता मन में पढ ले
तू गीता जन में गा ले 
तू मुक्‍त वायुमंडल में 
छिन सुखद सॉंस तो ले ले। १ 

जो योग है तुझे बताया 
वह परंपरा से आया 
तू सखा तथा है भक्‍त 
अति सुयोग्‍य तुझ को पाया। २ 

जब धर्महानि होती है 
जय अधर्म की दिखती है 
प्रभु अपना रूपही रचकर 
अवतीर्ण हुआ लगता है। ३ 

ये जनम करम का कूट 
जिस जिसने होगा जाना 
वह प्रपंच से है मुक्‍त 
मैंने/मुझसे न अलग है माना। ४ 

सज्‍जन की रक्षा करना 
दुर्जन को दंड दिलाना 
धर्म की स्‍थापना करना 
अवतारहेतु है माना। ५ 

ना चाहा फल कर्मों का 
बंधन ना आसक्ति का 
मैं प्रेमी निर्मोही का 
माधव हॅूं अर्जुनजी का। ६ 

आसक्ति गई जब मन से 
कर्तव्‍य लगा पूजन सा 
जो योगी है वही ज्ञानी 
नर नारायण के जैसा। ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

तू गीता मन में पढ ले 
तू गीता जन में गा ले 
तू मुक्‍त वायुमंडल में 
छिन सुखद सॉंस तो ले ले। १  

ज्ञानयोग से कर्मयोग है 
सुगम अधिक मत मेरा 
प्रकृति करती, वही मिटाती 
खेल उसी का सारा। २ 

छोड फलाशा कर्म करे जो 
स्‍वास्‍थ्‍य बडा पाता है 
सच्‍चा मानव केवल अपने 
लिए नही जिता है। ३ 

कर्म सिखाता, वही परखता 
मन को शुद्ध है करता 
मनमंदिर में भक्‍तजनोंके 
नाम ही मन बन जाता। ४ 

काम करे हर कोई अपना 
श्रद्धा रखकर मन में 
सशक्‍त बनता है उसका तन 
समाधान है घर में। ५ 

आत्‍मा में जो योगी रमता 
ज्ञानी है कहलाता 
आदि अन्‍तवाले भोगों से 
लेश न विचलित होता। ६ 

क्‍या है बाहर देखो अंदर 
राम कृष्‍ण बैठे है 
बिना शब्‍द के चुपके चुपके 
मिलन मधुर होता है। ७ 
   
रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले