वाहताना, मी न कळता अडखळूनी थांबले
मी तुषारे वंदिले! ध्रु.
ज्ञानदेवे योगिराजे जी समाधी साधली
तीच माझ्या अंतरंगी वेदनांनी बांधली
ज्ञानभक्ती एक जागी नवल ते मी पाहिले!१
वैष्णवांच्या डोळियांतुन अश्रुधारा वाहिल्या
भाववेडी होउनी मी झेलल्या त्या झेलल्या
तो न गेला, तो चिरंतन समजले ना उमजले!२
सगुणभक्ती दु:खमुक्ती सूत्र सोपे तो वदे
त्याच छंदा, त्याच गीता आळवीले मी मुदे
दुरिततिमिरा ज्ञानकिरणे एक निमिषी सारिले!३
दु:ख सरले, शल्य नुरले, मोदमूर्ती जाहले
श्रेय मिळले, प्रेय मिळले, मी कृतार्था जाहले
श्रीहरीच्या नामगजरे धुंदले वेडावले!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(संजीवन समाधी सोहळ्याच्या वेळचे इंद्रयाणीचे मनोगत)
No comments:
Post a Comment