नकोस टाळू विहित कर्म तू!ध्रु.
शास्त्र तसा व्यवहार पाहिला
विचार आता पक्का ठरला
लाजिरवाणा नकोस ठरू तू!१
क्षात्रोचित तू युद्धच करणे
कर्म आचरी चोखपणाने
अशास्त्र जे ते नकोस करू तू!२
कर्मप्रवृत्ती बलवत्तर
घडविल तुजकरवी संगर
अज्ञानासी सार दूर तू!३
कर्मभार तू मस्तकि घेशी
आणि श्रमाने दुःखी होशी
म्हणुनिच छळतो तुजसी किंतू!४
भगवत्प्राप्ती श्रेष्ठ कामना
आत्मरूप होण्यास साधना
हेतूविण सत्कर्मे कर तू!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
७/१/१९७४
खालील ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १५ वर आधारित काव्य.
आम्ही समस्तही विचारिले। तव ऐसेचि हे मना आले
जे न सांडिजे तुवा आपुले। विहित कर्म ।। २.२६५
परी कर्मफळी आस न करावी। आणि कुकर्मी संगति न व्हावी
हे सत्क्रियाचि आचरावी। हेतूवीण ॥२.२६६
No comments:
Post a Comment