"गीत गणेशायन"
कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले
संगीतकार : मोहिनीराज ओंकार
नरांतकाने आपला मृत्यूच मागितला. त्याने दिलेले द्वंद्व युद्धाचे आव्हान विनायकाने हसत हसतच स्वीकारले. विनाशकाले विपरीत बुद्धी: म्हणतात ते एकूण खरेच तर! नरांतकाचे सगळे गणितच चुकले. बाहेरच्या मदतीने साम्राज्य टिकणे शक्य नाही हे त्याने जाणलेच नाही. नरांतकाला मृत्युदंड देण्यापूर्वी महोत्कटाने त्याच्या पापांचा पाढा प्रकटपणे वाचला- उरलेसुरले ओढून आणलेले अवसानही गळूनच जावे इतका आवेश विनायकाच्या ओजस्वी भाषणात ओतप्रोत भरला होता.
विपरीत काल आलाss
नरांतका मूर्खा - मूर्खा नरांतका!ध्रु.
तुझे पाप ये तुझ्या शिरावर
भार केवढा या भूमीवर
अंत न दिसतो का?१
परकीयांना धरूनी हाती
सत्तालोलुप सत्ता वरिती
व्यर्थच वटवट का?२
साम्राज्याचा पोकळ पाया
प्राणहीन जणु उरली काया
उगाच धडपड का?३
उन्मादाचे वारे माथी
घात साधशी अपुल्या हाती
दाविशि डौल फुका!४
द्वंद्वयुद्ध? तू मृत्यु इच्छिला
आमंत्रण तू दिलेस काला
शेवट दिसत निका!५
विपरीत काल आलाss
नरांतका मूर्खा - मूर्खा नरांतका!ध्रु.
तुझे पाप ये तुझ्या शिरावर
भार केवढा या भूमीवर
अंत न दिसतो का?१
परकीयांना धरूनी हाती
सत्तालोलुप सत्ता वरिती
व्यर्थच वटवट का?२
साम्राज्याचा पोकळ पाया
प्राणहीन जणु उरली काया
उगाच धडपड का?३
उन्मादाचे वारे माथी
घात साधशी अपुल्या हाती
दाविशि डौल फुका!४
द्वंद्वयुद्ध? तू मृत्यु इच्छिला
आमंत्रण तू दिलेस काला
शेवट दिसत निका!५
No comments:
Post a Comment