भगवंता तू उदरी ये -
"गीत गणेशायन"
कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले
संगीतकार : मोहिनीराज ओंकार
हिमालयाच्या परिसरात कश्यप ऋषींचा आश्रम होता. त्यांच्या गुरुकुलात २१०० विद्यार्थी शिकत होते. सारे विद्यार्थी अगदी मुलासारखे वागून वेदविद्या घेत. कश्यपांची पत्नी अदिती. तीही त्या बटुंवर आईसारखेच प्रेम करी. पण तिला स्वतःचा मुलगा हवा होता. तो शहाण्यात शहाणा हवा. कर्तृत्ववान असावा. कुळाचे नाव काढणारा असावा असे तिला स्वाभाविकच वाटे. तिने उपासना आरंभली, सूर्याकडे डोळे लावले, भक्ती केली. मनासारखा मुलगा मागितला. कोणाला? भगवंतालाच. सर्व आर्तता एकवटून तिने प्रार्थिले - भगवंता तू उदरी ये, परमात्म्या, तू माझा पुत्र झाल्याशिवाय माझे चित्त स्थिर होणार नाही.
भगवंता तू उदरी ये! ध्रु.
उत्कट इच्छा हीच असे
स्वातंत्र्याची आस असे
सामर्थ्यासह उदरी ये!१
येथे अवतर देवा सत्वर
दुष्टांचे तू निर्दालन कर
साधुजना रक्षाया ये!२
दिग्विजयी मज पुत्र हवा
नेत्यांचा आदर्श हवा
कृतार्थ करण्या ये रे ये!३
उपासना मी चालवली
आकांक्षा मनि पालवली
धर्मासाठी अवश्य ये!४
हे आवाहन मांगल्याला
मांगल्याला सामर्थ्याला
सुखदा, वरदा ये रे ये!५
भगवंता तू उदरी ये! ध्रु.
उत्कट इच्छा हीच असे
स्वातंत्र्याची आस असे
सामर्थ्यासह उदरी ये!१
येथे अवतर देवा सत्वर
दुष्टांचे तू निर्दालन कर
साधुजना रक्षाया ये!२
दिग्विजयी मज पुत्र हवा
नेत्यांचा आदर्श हवा
कृतार्थ करण्या ये रे ये!३
उपासना मी चालवली
आकांक्षा मनि पालवली
धर्मासाठी अवश्य ये!४
हे आवाहन मांगल्याला
मांगल्याला सामर्थ्याला
सुखदा, वरदा ये रे ये!५
No comments:
Post a Comment