Saturday, October 3, 2015

महोत्कट प्रिय ज्याला त्याला - "गीत गणेशायन"


महोत्कट प्रिय ज्याला त्याला -
"गीत गणेशायन"
कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले
संगीतकार : मोहिनीराज ओंकार

दुष्टांचा नाश हे सोपवलेले कार्य महोत्कट नक्कीच पार पाडणार. सर्व विद्या याला अवगत. लोकप्रिय तरी किती! महोत्कट देहाने सुदृढ होता. त्याच्या बुद्धीला उपासनेमुळे चांगली धार चढली होती. तो योगी देखील होता. एकएक गुण आत्मसात करून गुणेशच बनला जसा काही तो. त्याचा आत्मविश्वास काही निराळाच. दीनजनांविषयी त्याला कोण आत्मीयता! जग त्याच्या गुणांची वाखाणणी करू लागलं. काय होतं त्याच्या लोकप्रियतेचं रहस्य? ऐकाच तर ....

महोत्कट प्रिय ज्याला त्याला!ध्रु.
जे वाचावे सहज कळावे
कळले ते स्मरणात रहावे
मुग्ध मित्रमेळा!१

देहे सुदृढ शुद्ध मतीचा
पुतळा गमला कल्पकतेचा
शास्त्रे वश याला!२

ध्यान-समाधी सहजच साधे
विघ्न न कुठले याला बाधे
कर्मि कुशल झाला!३

उपासनेला दृढ चालवतो
बळ मेळवितो गुण जोडे तो
विवेक हा शिकला!४

दीनजनांना हृदयी धरतो
अश्रू पुसतो - दुःख पळवितो
त्राता जगताला!५ 

No comments:

Post a Comment