"गीत गणेशायन"
कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले
संगीतकार : मोहिनीराज ओंकार
पाचवे वर्ष लागले, बाळाचे उपनयन व्हायला हवे, कश्यपांनी महोत्कटाला गायत्रीचा उपदेश केला. मातेने त्याला भिक्षावळ घातली. इंद्राने प्रचिती घेऊनच महोत्कटाला विनायक नाव शोभते अशी संमती दिली. बटूनेच इंद्राला अभय दिले. मुंजीतली भिक्षावळ म्हणून वस्तू तरी कोणत्या मिळाल्या? वाहन मिळाले, शस्त्रे मिळाली, कवच लाभले, शुभाशीर्वाद तर मिळालेच मिळाले! कश्यपनंदनाची मुंज गाजली खरी. ब्राह्म आणि क्षत्रिय तेजाचा पवित्र संगम दिसून आला. ते वर्णन मुळातूनच ऐकण्यासारखे आहे.
उपनयन जाहले, उपनयन जाहले! ध्रु.
विधीने त्या कमळ दिले
वरुणाने पाश दिले
बंध शिकवले!१
गायत्री मंत्र मिळे
निमिषार्धी सर्व कळे
नवल वर्तले!२
सिंह दिला, परशु दिला
दुष्टनाश सोपविला
खचित आगळे!३
शत्रूंचा नाश करी
मोदाने विश्व भरी
हेच प्रार्थिले!४
शस्त्रांची भिक्षावळ
नाचतसे मुंडावळ
लक्ष वेधले!५
उपनयन जाहले, उपनयन जाहले! ध्रु.
विधीने त्या कमळ दिले
वरुणाने पाश दिले
बंध शिकवले!१
गायत्री मंत्र मिळे
निमिषार्धी सर्व कळे
नवल वर्तले!२
सिंह दिला, परशु दिला
दुष्टनाश सोपविला
खचित आगळे!३
शत्रूंचा नाश करी
मोदाने विश्व भरी
हेच प्रार्थिले!४
शस्त्रांची भिक्षावळ
नाचतसे मुंडावळ
लक्ष वेधले!५
No comments:
Post a Comment