"गीत गणेशायन"
कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले
संगीतकार : मोहिनीराज ओंकार
महोत्कट नाव तुझे
बालकाs बालकाss बालकाsss
महोत्कट नाव तुझे
विनायक नाव दुजे ।। ध्रु ।।
भाल पाहिले, सुचिन्ह दिसले
लुकलुकताती इवले डोळे
वंदन घे अमुचे ।। १ ।।
सकल जगाला तारायाला
भूवरती तू असशी आला
पूजन करत तुझे ।। २ ।।
तुझीच आम्ही करत प्रार्थना
हाच गाइला तुला पाळणा
पालन कर अमुचे ।। ३ ।।
तुजमध्ये आकांक्षा केंद्रित
राष्ट्रोद्धारा होई उद्यत
करितो भजन तुझे ।। ४ ।।
बलवंताचे राष्ट्र जगतसे
विकीर्ण त्यांना कोण पुसतसे
संघच रुप तुझे ।। ५ ।।
No comments:
Post a Comment