"गीत गणेशायन"
कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले
संगीतकार : मोहिनीराज ओंकार
नरांतक आणि देवान्तक यांचा वध करण्यासाठीच कश्यपपुत्र म्हणून हा जन्म झालेला.
जसा साद तसा प्रतिसाद. नवयुवक संघटित झाले. युवतीही राष्ट्र उभारणीच्या कार्यात मागे थोड्याच राहतील. नरांतका ने विनायकाच्या घातासाठी कपटाचा आश्रय घेऊन जे जे उपाय केले ते ते सगळे वायाच गेले.
यश हवे असेल तर अनुशासन हवे, ऐक्य हवे, विजिगीषा हवी, निर्धार हवा. विनायकाच्या अनुयायांजवळ यातील सर्व काही होतेच. आपण सगळेच रणझुंजार असल्याची ग्वाही देत वीर गर्जले -
अजिंक्य अमुचि ध्येयासक्ति,
अजिंक्य हा निर्धार,
आम्ही सगळे रणझुंजार || धृ ||
जय विनायक, जय विनायक
गर्जन करता प्रभु सहायक
निश्चित जय मिळणार ||१||
नियमित जागी सुसज्ज राहू
शत्रूची तर चाहुल घेऊ
दक्ष तोच जगणार ||२||
अनुशासन हा मंत्र यशाचा
आदर्शच श्री नेतृत्वाचा
रणवाद्ये कथणार ||३||
सुसंघटीतता शक्ति देतसे
शक्ति लाभता युक्ति सुचतसे
जयगाथा लिहिणार ||४||
मातृभूमिची लाज राखणे
तनमनधन सर्वस्व अर्पणे
प्राणपणे लढणार ||५||
No comments:
Post a Comment