जय जय सिद्धिविनायक जय -
"गीत गणेशायन"
कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले
संगीतकार : मोहिनीराज ओंकार
आपल्याला नेता हवा तो विनायक, स्वराज्याची स्थापना करणारा, तिमिराचा नाश करणारा, चैतन्याचा प्रबळ स्रोतच. मूर्तिमंत आनंद, उत्साह, संघयुगाचा निर्माता, आत्मबल जागृत करणारा, सुखकर्ता आणि अर्थातच दुःखहर्ता, महोत्कट, ज्याचे सर्वच काही भव्य, दिव्य, स्मरणीय, शक्ति-युक्ति यांचा संगमच, सूर्याचा उपासक, मोदाचा वितरक, प्रभावी वक्ता, चारित्र्यसंपन्न नेता, सिद्धींचा नायक, वेदांचा गायक, साधूंचा सरंक्षक, दुष्टांचा निर्दालक. त्या सिद्धिविनायकाचा जयजयकार करून इतिहासाच्या गायनाला आरंभ करू या-

जय जय सिद्धिविनायक जय
जय जय सिद्धिविनायक जय ।।ध्रु।।
महोत्कटा हे विनायका
पूजार्हा हे विनायका
चैतन्याच्या स्त्रोता जय । जय । जय । ।।१।।
स्वराज्य स्थापन कार्य तुझे
अद्वितिय रे स्थान तुझे
हे तिमिरनाशना जय । जय । जय । ।।२।।
स्तोत्र स्फुरवी संघयुगाचे
संघयुगाचे आत्मबलाचे
हे राष्ट्रोद्धारक जय । जय । जय । ।।३।।
तुजवर केंद्रित सगळ्या दृष्टी
हसव फुलव रे अवघी सृष्टी
हे नवनिर्मात्या जय । जय । जय । ।।४।।
शक्ति युक्ति एकत्र नांदता
लोपतेच मग ती परवशता
जय श्री विघ्नेश्वर जय । जय । जय । ।।५।।
No comments:
Post a Comment