"गीत गणेशायन"
कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले
संगीतकार : मोहिनीराज ओंकार
राष्ट्रीय अस्मिता जागृत होण्याला नेता हवा विनायकासारखाच! संघशक्ती हेच सत्य. एकटी व्यक्ती काय आणि कितीसे कार्य करू शकणार?
श्रीगणपती हे विद्येचे दैवत. विद्या म्हणजेच जीवनशास्त्र. गणपतीची पूजा नि उत्सव करायचा तो अशी स्फूर्ती लाभण्यासाठीच. पुरुषार्थी, अक्कलवंत आणि निर्मळ जीवन जगावे. समाजाला बरोबर घेऊन राष्ट्रीय जीवनाला तेजस्वी करावे - थोरांसारखे थोडे तरी करावे तेव्हा थोरांची खरी पूजा होते. करू या तर आता - श्री गणेशाय नमः।
विनायकासम लाभे नेता
जागृत हो राष्ट्रीय अस्मिता!ध्रु.
संघटनेचे सूत्र नवे
आचरिण्याला हवे हवे
संघशक्ति हे सत्यचि आता!१
राष्ट्रासाठी, धर्मासाठी
उतरायाची कठिण कसोटी
निर्धाराने पाय रोविता!२
अजिंक्य आम्ही, निर्भय आम्ही
व्रतस्थ आम्ही, ज्वलंत आम्ही
सिद्ध सर्वदा त्यागाकरिता!३
श्रद्धा पुरवित बल आम्हा
तेज चढतसे पराक्रमा
स्वातंत्र्या उत्सुक असता!४
उद्यम करि तो भाग्याचा
स्वामी सगळ्या हृदयांचा
कविता बनली कृतज्ञता!५

No comments:
Post a Comment